घरICC WC 2023WC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून वादाचा प्रयत्न; अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

WC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून वादाचा प्रयत्न; अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल वेगवान गोलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

Subscribe

अहमदाबाद : आयसीसी एकदिवसी विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. परंतु या सामन्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी वादात सापडली होती. न्यूझीलंडच्या स्थानिक माध्यमांनीही खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आयसीसीनेही यावर वक्तव्य करून टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. असे असतानाच आता विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. परंतु अंतिम सामन्याआधीच मैदानावरील खेळपट्टीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. खेळपट्टीबाबत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे वक्तव्य समोर आले आहे. (Attempts by Australia to argue before the final Fast bowler statement about Ahmedabad pitch in discussion)

हेही वाचा – ICC WC 2023 Final: अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? जाणून घ्या

- Advertisement -

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला उपांत्य फेरीचा सामना हा नव्या खेळपट्टीऐवजी वापरलेल्या खेळपट्टीवर खेळवण्यात आल्याचा दावा त्यांच्या स्थानिक माध्यमांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आयसीसीने म्हटले होते की, अशा घटनांमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. यावर कोणत्याही प्रकारची टीका करणे योग्य नाही, जर खेळपट्टी बदलली असेल तर ती आयसीसीच्या माहितीने करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधत असताना मिचेल स्टार्कला अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल विचारले असता तो म्हणाला की, हा सामना कोणत्या विकेटवर खेळवला जाईल हे अद्याप माहित नाही. त्यामुळे अंतिम सामना नव्या खेळपट्टीवर खेळवला जाईल की जुन्या खेळपट्टीवर हे तिथे पोहोचल्यावरच कळेल, असे मिचेल स्टार्कने म्हटले होते.

- Advertisement -

मिचेल स्टार्ककडून भारताचे कौतुक

विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना चेन्नई येथे झाला होता. आता स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात म्हणजेच ग्रँड फिनालेमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. साखळी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाला 199 धावांत गुंडाळले होते. प्रत्युत्तरादाखल सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना भारतीय संघाने केएल राहुल आणि विराट कोहलीच्या खेळीमुळे विजय मिळवला होता. याचपार्श्वभूमीवर बोलताना मिचेल स्टार्कने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ आमनेसामने येणार आहे. अंतिम सामन्यात दडपण असेल यात शंका नाही. आम्ही विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना केला होता आणि आता शेवटच्या सामन्यातही आम्ही त्यांचा सामना करणार आहोत. यापेक्षा सुंदर क्षण असूच शकत नाही.

हेही वाचा – IND Vs AUS Final: फायनलसाठी पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित; खास एअर शोचे आयोजन

विश्वचषक 2023 मध्ये दोन्ही संघांची कामगिरी

विश्वचषक 2023 स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघ आतापर्यंत सर्व सामने जिंकून अजिंक्य राहिला आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग आठ सामने जिंकत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला विश्वचषकात विजय रथ कायम ठेवत तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे आव्हान असणार आहे तर, ऑस्ट्रेलियाचा सहावी विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -