घरलाईफस्टाईलभिंतींवरील तेलकट डाग काढण्यासाठी वापरा 'या' टिप्स

भिंतींवरील तेलकट डाग काढण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

Subscribe

दिवाळीच्या सणात भिंतींवर किंवा टाइल्सवर तेलाचे डाग दिसणे ही सामान्य गोष्ट आहे. पण हे डाग काढायचे कसे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. अशातच आता हे डाग काढण्यासाठी घरगुती उपाय देखील तुम्ही करू शकता. तसेच चिकट डाग कायमचे दूर करण्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत. तेलाचे डाग जात नाहीत असे आपल्याला वाटते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर आता तसे करायचे काहीच कारण नाही. बिधास्तपणे तुम्ही हे डाग काढू शकता अगदी कमी वेळात.

Cleaning Textured Walls Made Easy | Zameen Blog

- Advertisement -

1. लिक्विड डिश वॉशने तेलाचे डाग काढून टाका

दिवाळीच्या सणात भिंती आणि टाइल्सवरील तेलाचे डाग काढणे सोपे नाही, पण तुम्ही लिक्विड डिश वॉशच्या मदतीने ते सहजपणे ते डाग काढू शकता.

 • प्रथम, साबणाच्या पाण्याने डाग असलेली जागा हळूवारपणे धुवून घ्या.
 • नंतर, एका कपड्यावर थोडे लिक्विड घ्या आणि ते डागावर घासून घ्या.
 • हे झाल्यावर काही मिनिटांनंतर, ओलसर कापडाने डाग पुसून टाका.
 • डाग अजूनही दिसत असल्यास थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी ही प्रक्रिया पुन्हा करा.

2. बेकिंग सोडा वापरा

 • बेकिंग सोडा हे एक नैसर्गिक सोल्युशन आहे.
 • जे तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे.
 • तेलाच्या डागावर बेकिंग सोडा लावा आणि काही मिनिटाने ते पुसून घ्या.
 • यामुळे बेकिंग सोडा तेल शोषून घेईल आणि डाग फिकट होईल.
 • त्यानंतर, बेकिंग सोडा काढून टाकण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.

3. लिंबाचा रस

 • लिंबाचा रस ऍसिड सारखे काम करतो, जे तेल  मदत करते.
 • तेलाच्या डागावर लिंबाचा रस घाला आणि काही मिनिटे सोडा.
 • यानंतर, लिंबाचा रस काढून टाकण्यासाठी ओलसर कापडाने डाग स्वच्छ करा.

4. व्हिनेगर

 • व्हिनेगर एक आम्ल पदार्थ आहे ज्यामुळे तेलाचे डाग लगेच जातात.
 • पाण्यात व्हिनेगर मिसळून हे सोल्युशन तयार करू शकता.
 • तेलाच्या डागावर हे सोल्युशन घाला आणि काही मिनिटे तसेच ठेवा.
 • यानंतर, हे सोल्युशन पुसण्यासाठी ओलसर कापडाचा वापर करा.

________________________________________________________________________

- Advertisement -

हेही वाचा : फ्रिजवर असलेले डाग असे घालवा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -