घरक्रीडाIND Vs ENG Test : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी; जैस्वालचे...

IND Vs ENG Test : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी; जैस्वालचे पुन्हा शतक

Subscribe

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी गुजरातमधील राजकोटमध्ये सुरू आहे. कसोटीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पाठदुखीमुळे 133 चेंडूत 104 धावा करून यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ड झाला.

राजकोट : तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 196 धावा केल्या आहेत. सध्या कुलदीप यादव तीन धावांवर नाबाद असून, शुभमन गिल 65 धावांवर नाबाद आहे. (IND vs ENG Test: India lead by 322 runs at the end of the third day Jaiswals third Test century)

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी गुजरातमधील राजकोटमध्ये सुरू आहे. कसोटीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पाठदुखीमुळे 133 चेंडूत 104 धावा करून यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ड झाला. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. तो उद्या फलंदाजीला येणार की, नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

- Advertisement -

इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या डावात भारताने 322 धावांची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात 126 धावांची आघाडी मिळाली.

यशस्वी जैस्वाल रिटायर्ट हर्ट

पाठदुखीमुळे यशस्वी जैस्वाल रिटायर्ट हर्ट झाला आहे. त्याने 133 चेंडूत 104 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर स्टेडियममधील प्रेक्षकांनी त्याचे उभे राहून अभिनंदन केले. इंडियन ड्रेसिंग रूममधील सर्वांनीही उठून टाळ्या वाजवल्या. इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही उभे राहून यशस्वी जैस्वालसाठी टाळ्या वाजवल्या. स्टोक्सनेही यशस्वीचे अभिनंदन केले.

- Advertisement -

हेही वाचा : Supriya Sule : देणार असालच तर तगडा उमेदवार द्या…सुप्रिया सुळे यांचे आव्हान

रोहित शर्माने केले आजही निराश

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 19 धावा करून बाद झाला, तेव्हा दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या 30 धावा होती. मात्र, त्यानंतर यशस्वी जैस्वालसह शुबमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. यानंतर यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ही भागीदारी तुटली. यशस्वीने मैदान सोडल्यानंतर रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र, तोही शून्यावर बाद झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -