घरमहाराष्ट्रSupriya Sule : देणार असालच तर तगडा उमेदवार द्या...सुप्रिया सुळे यांचे आव्हान

Supriya Sule : देणार असालच तर तगडा उमेदवार द्या…सुप्रिया सुळे यांचे आव्हान

Subscribe

बारामती : बारामती या पवारांच्या होमपीचवर सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यावरून सध्या चांगलेच दावे रंगताना दिसत आहेत. नणंद – भावजयीमध्ये हा सामना रंगणार का, याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी देखील ही लोकशाही आहे, कोणीही कोणासमोर उभा राहू शकतो, असे सांगितले. या चर्चांवर आता सुप्रिया सुळे यांनी देखील मत व्यक्त केले आहे. बारामतीमध्ये माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर तुम्ही सांगाल त्याठिकाणी, सांगाल त्या वेळेला मी कोणत्याही विषयावर त्या उमेदवाराशी चर्चा करायला तयार आहे, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले.

उमेदवार माझ्यासारखा तगडा हवा

बारामती मतदारसंघात मी देईन त्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन अजित पवार यांनी बारामतीमधील लोकांना केले आहे. मी निवडणुकीला उभा आहे, असे समजून मतदान करा. जर लोकसभेला माझ्या उमेदवाराला मतदान नाही केले, तर विधानसभेला मी उभा राहणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना लोकशाहीमध्ये निवडणुकीसाठी कुणीतरी विरोधात उभे राहणारच. त्यांच्याकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर त्यांनी उभा करावा, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या उमेदवाराशी मी जाहीर चर्चा करायला तयार आहे. ते म्हणतील त्या ठिकाणी, कधीही आणि कोणत्याही विषयावर मी चर्चा करण्यासाठी तयार आहे, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – IND Vs ENG Test : तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे 322 धावांची आघाडी; जैस्वालचे तिसरे कसोटी शतक

माझं राजकारण जनसेवेचं

“अजित पवार यांच्या भाषणानंतर मला वेदना झाल्या. राजकारण कौटुंबिक पातळीवर आणून ठेवलं आहे. माझं राजकारण कौटुंबिक नसून जनसेवेचं आहे. मी राजकारणात, समाजकारण चांगला बदल घडविण्यासाठी एक धोरणकर्ती म्हणून पुढे आले. बारामतीमधील लोकांनी मला तीन वेळा निवडून दिले. संसद हे लोकशाहीचे सर्वात मोठे मंदिर आहे. लोकशाहीवर अविश्वास दाखवणे चिंताजनक आहे. हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा, अशी काहींची इच्छा आहे का? अशी शंका मनात येते”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संसदेत भाषणं करून कामं होत नसतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Jnanpith Award : गीतकार गुलजार, जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदाचा संसद महारात्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर होताच सुप्रिया सुळे यांनी तो बारामती लोकसभेतील मतदारांना अर्पण केला. तसेच माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांच्या भाषणातील मुद्द्यावर टीका केली. काही लोकांनी संसदेवर आणि तेथील चर्चेवर जी टीका केली, ती अयोग्य असून हा एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -