घरक्रीडाInd vs Nz 2nd test : वानखेडेवर भारताचा फलंदाजीचा निर्णय, Playing XI...

Ind vs Nz 2nd test : वानखेडेवर भारताचा फलंदाजीचा निर्णय, Playing XI काय ? कोणाला संधी, कोणाला डच्चू ?

Subscribe

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारताने वानखेडेवर टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून स्वतः विराट कोहली या सामन्यात भारताचे नेतृत्व करणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाचीही धुरा या सामन्यात नसणार आहे. न्यूझीलंड संघाची धुरा टॉम लेथम सांभाळणार आहे. (Ind vs nz 2nd test new Zealand and Indian team playing eleven for Mumbai test at Wankhede)

मुंबईत कसोटी सामन्यासाठी कर्णधार पदाची धुरा विराट कोहली सांभाळणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेची जागी आता विराट कोहलीची वर्णी या सामन्यात लागली आहे. तर इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. तर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या जागेवर जयंत यादवला संधी देण्यात आली आहे. भारत या सामन्यात एक अतिरिक्त गोलंदाजासह उतरला आहे.

- Advertisement -

न्यूझीलंड संघात कोणाला संधी ?

न्यूझीलंडच्या संघात कर्णधारपदी टॉम लॅथम असणार आहे. त्यासोबतच विल यंग, डॅरेल मिशेल, रॉस टेलर, हेनरी निकोलस, टॉम ब्लंडेल, रचीन रवींद्र, कायल जेमीसन, विलिअम सोमरविल्ली, अजाझ पटेल यांनी संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

Ind vs Nz : मुंबईकर महिलांकडे स्कोअररची जबाबदारी, ११ वर्षांची प्रतिक्षा संपली

भारतीय संघाच्या मुंबई कसोटी सामन्याआधी क्रीडाप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईकर असलेला अजिंक्य रहाणेसोबतच आणखी दोन महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय हा बीसीसीआयने घेतला आहे. भारतीय संघातील तीन खेळाडू हे दुखापतग्रस्त झाल्याने मुंबई कसोटीतून विश्रांती घेत असल्याची माहिती बीसीसीआय (BCCI)कडून आज सकाळी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंचा समावेश आहे. तिन्ही खेळाडू हे कानपूर कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाले होते. पण मुंबई कसोटी सामन्यासाठी त्यांच्या फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी न ठरल्यानेच त्यांनी विश्रांती देण्यात आली आहे. मुंबईतील कसोटी सामन्यामध्ये मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणेचा संघाला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त झाल्याने त्याला विश्रांती देत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.


Ind vs Nz : मुंबई कसोटीत ३ खेळाडूंना विश्रांती, वानखेडेवर ७८ ओव्हरचा खेळ होणार – BCCI

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -