घरमहाराष्ट्रमनसे नेत्यांची आज शिवतिर्थावर बैठक; भाजपसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

मनसे नेत्यांची आज शिवतिर्थावर बैठक; भाजपसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

Subscribe

राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मनसेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १२ च्या दरम्यान ही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसंच, राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना त्यांच्या विभागातील अहवाल तयार करावा असे आदेश दिले होत. यावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

मागील काही महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाड आदी भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मनसे-भाजप युतीवर चर्चा होऊ शकते.

राज ठाकरे हे मागील महिन्यांपासून राजकीय दौरे करत आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई आदी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दौरे केले होते. तसंच, राज ठाकरे आता ६ डिसेंबरपासून नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -