घरक्रीडाInd vs Nz : मुंबईकर महिलांकडे स्कोअररची जबाबदारी, ११ वर्षांची प्रतिक्षा संपली

Ind vs Nz : मुंबईकर महिलांकडे स्कोअररची जबाबदारी, ११ वर्षांची प्रतिक्षा संपली

Subscribe

भारत विरूद्ध न्यूझीलंड मुंबई कसोटी सामन्याला गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे उशिराने सुरूवात होणार आहे. पण मुंबईतील हा सामना थोडासा खास असणार आहे तो म्हणजे महिला स्कोअररच्या निमित्ताने. वानखेडे स्टेडिअमवर दोन महिला स्कोअरर या संपूर्ण सामन्याची जबाबदारी सांभाळणार आहेत. मराठमोळ्या क्षमा साने आणि सुषमा सावंत या दोन महिलांकडून ही जबाबदारी पार पाडण्यात येईल. वानखेडे स्टेडिअमवर दोन महिला स्कोअररकडून अशी जबाबदारी पहिल्यांदाच पार पाडण्याच येणार आहे. याआधी सौराष्ट्र येथे एका सामन्यात महिला स्कोअरर जोडीने कसोटी सामन्यासाठी स्कोअरींगची दबाबदारी पार पाडली होती. जवळपास ११ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या दोन्ही मुंबईकर महिलांना वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात ही स्कोअररची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणार आहे.

क्षमा साने आणि सुषमा सावंत या दोघींनीही २०१० साली बीसीसीआयची स्कोअररची परीक्षा उत्तीर्ण केली. दोघीही मुंबईकर आहेत. मुंबईतील कसोटी सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर कसोटी सामन्यासाठी स्कोअरर म्हणून जबाबदारी सांभाळण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. याआधी वानखेडे स्टेडिअमवर महिला स्कोअररकडून ही जबाबदारी कोणीच पार पडली नव्हती. त्यामुळेच या दोन्ही महिलांच्या नावे या नव्या गोष्टीची सुरूवात झाल्याची नोंद होईल. क्षमा साने या ४५ वर्षीय असून नाहूरच्या रहिवासी आहेत. तर सुषमा सावंत या ५० वर्षीय असून चेंबूरच्या रहिवासी आहेत. बीसीसीआयकडून घेण्यात येणाऱ्या स्कोअरींगच्या परीक्षेत दोघीही उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर दोघांनाही जवळपास ११ वर्षांनी ही संधी मिळाली आहे.

- Advertisement -

भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये न्यूझीलंडकडे १९८८ नंतर भारतात येथून कसोटी मालिका नावावर करण्याची संधी आहे. तर भारताला सलग विजयाची मालिका कायम ठेवण्याची संधी या सामन्याच्या माध्यमातून मिळणार आहे. विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाल्याने संघात पुन्हा एकदा आणखी बळ मिळणार आहे. त्यासोबतच विराटचा कसोटी क्रिकेटमधील अनुभवही कामी येणार आहे. विराटच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ आणखी मजबुत मानला जात आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -