घरक्रीडाIND vs SL : भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचे सावट? फलंदाजी प्रशिक्षकांसह श्रीलंकेचे दोन सदस्य पॉझिटिव्ह

IND vs SL : भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचे सावट? फलंदाजी प्रशिक्षकांसह श्रीलंकेचे दोन सदस्य पॉझिटिव्ह

Subscribe

भारत-श्रीलंका मालिकेला केवळ चार दिवस शिल्लक आहेत.

भारतीय संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १३ जुलैला खेळला जाणार आहे. परंतु, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी श्रीलंकन संघाच्या दोन सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर यांच्यानंतर डेटा अ‍ॅनालिस्ट जी. टी. निरोशन यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले. निरोशन यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सर्व सदस्यांची चाचणी 

श्रीलंकन राष्ट्रीय संघाचे डेटा अ‍ॅनालिस्ट जी. टी. निरोशन यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रांट फ्लॉवर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतर सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांची पीसीआर चाचणी झाली होती. यात निरोशन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, असे श्रीलंका क्रिकेटने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह 

श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्याहून मायदेशी परतल्यानंतर दोन दिवसांत म्हणजेच गुरुवारी ग्रांट फ्लॉवर यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मायदेशी परतल्यावर क्वारंटाईन असलेल्या इतर खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. आता फ्लॉवर यांना क्वारंटाईन असलेल्या श्रीलंकन संघाच्या इतर सदस्यांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. फ्लॉवर हे श्रीलंकन संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेले होते.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -