घरCORONA UPDATEZika Virus नेमका पसरतो कसा? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार पद्धती

Zika Virus नेमका पसरतो कसा? जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार पद्धती

Subscribe

कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत नाही तोवर देशात आता झिका विषाणूची भीती निर्माण झाली आहे. केरळमधील एका गर्भवती महिलेच्या शरीरात झिका विषाणुची लक्षणे आढळली आहे. या महिलेवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होत त्या रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांचे रिपोर्ट देखील झिका पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे केरळमध्ये झिका पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे, परंतु हा झिका विषाणू आहे कसा किंवा तो पसरतो कसा? याची लक्षणे आणि उपचार कसा कराल जाणून घेऊया…

झिका विषाणूचा संसर्ग हा डासांमुळे होणारा संसर्ग जन्य आजार आहे. डासांच्या एडीज प्रजातीद्वारे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या एडीज डासांमुळे डेंग्यु आणि चिकनगुनिया आजाराचा देखील प्रसार होत आहे. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना झिका विषाणूची लागण होते. हे डास इतर व्यक्तींना चावल्यास त्यांनाही झिका विषाणूची लागण होत आहे. गर्भवती महिलांना झिका विषाणूचा सर्वाधिक धोका आहे. यामुळे झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांना मायक्रोसेफॅली आजार होऊ शकतो. हा एक दुर्मिळ आजार असून यात जन्माला आलेल्या बाळाचे डोके सामान्य बालकांच्या डोक्यापेक्षा लहान असते. तसेच मेंदु संबंधीत विकार होतात.

- Advertisement -

कसा पसरतोय झिका विषाणू

एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एडीस डासांनी एखाद्या व्यक्तीस चावल्यास एडीस विषाणूची लागण होत आहे. हे डास प्रामुख्याने दिवसा चावतात. झिका विषाणूचा संसर्ग काही दिवस तर काही लोकांमध्ये जास्त काळ शरीरात राहू शकतो. प्रामुख्याने याची लक्षणे ३ ते ४ दिवस किंवा जास्तीत जास्त २ ते ७ दिवस राहतात. या संक्रमित व्यक्तीला चावलेल्या डास इतर लोकांमध्ये विषाणुचा संसर्ग पसरु शकतो. लैंगिक संबंध आणि दूषित रक्त स्त्रोताच्या माध्यमातून झिका विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

झिका विषाणूची प्रमुख लक्षणे

झिका विषाणुची लागण झालेल्या रुग्णास ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखी, शारीरिक अशक्तपणा, डोळे लाल होणे, उलटी, ही लक्षणे दिसतात. झिका विषाणूबाधित राज्यातून तुम्ही प्रवास करुन आल्यास आणि अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे अनेक इतर कारणांमुळे देखील दिसू शकतात. डॉक्टर आपली लक्षणे आणि प्रवास करुन आलेल्या ठिकाणावरून तुम्हाला झिका विषाणू संसर्ग झाला आहे की नाही याचे निदान करु शकतात.

- Advertisement -

झिका विषाणूवर उपचार पद्धती

झिका विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणताही लस किंवा औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ताप आणि डोकेदुखीसारखी लक्षणे आढळ्यास डॉक्टर औषधाची शिफारस करु शकतात. परंतु रुग्णाने सतत पाणी प्यावे आणि शरीर हायड्रेड ठेवण्याचा प्रयत्न करा.

‘या’ ठिकाणांपासून रहा दूर 

डासांचा मुख्य प्रार्दुभाव अंधार, ओलसर जागा आणि साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. यासाठी गम बुट, बग स्प्रे आणि मच्छरदाणीचा वापर करावा. परंतु तशीच काही लक्षणे आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा विषाणू कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसला तरी संसर्गा रोखण्यासाठी योग्यती खबरदारी घ्या.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -