घरक्रीडाInd Vs WI : रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला मालिका...

Ind Vs WI : रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजविरूद्ध पहिला मालिका विजय

Subscribe

रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडियाने ४४ धावांनी जिंकला सामना

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरोधात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबतच भारताने वेस्ट इंडिजविरोधातील ही एकदिवसीय मालिका जिंकली. रोहितच्या कर्णधार पदामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या मालिकेतच भारताला विजय मिळाला आहे. भारताने २० ने या मालिकेवर विजय मिळवला. एकुण तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये रोहितने सलग दोन्ही सामने जिंकले आहे. या मालिकेतील शेवटचा सामना हा ११ फेब्रुवारीला आहे. भारतीय फलंदाजांनी आज निराशा केली असली, तरीही गोलंदाजीच्या जोरावर भारताने आजचा सामना जिंकला. भारताने वेस्ट इंडिजला २३७ धावांचे लक्ष्य दिले होते. पण वेस्ट इंडिजचा संघ हा १९३ धावांवर ऑल आऊट झाला.

- Advertisement -

भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण टॉस जिंकल्यानंतरही भारताला अवघ्या २३८ धावाच बनवता आल्या. भारताने आज फलंदाजीतही प्रयोग केले. पण हे प्रयोग मात्र यशस्वी ठरले नाहीत. भारताने सलामीलाच रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला पाठवले होते. पण अवघ्या ९ धावांच्या संघाच्या स्कोअरवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. तोदेखील टीमच्या ३९ धावा झालेल्या असताना बाद झाला. रिषभ पंतने १८ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहलीलाही मोठी इनिंग खेळता आली नाही. विराटही स्वस्तात बाद झाला.

त्यानंतर केएल राहुल आणि सूर्य कुमार यादवने भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी मिळून टीमचा स्कोअर १०० च्या पुढे नेला. त्यानंतर राहुल बाद झाला. त्याला आपले अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. अवघ्या ४९ धावा करत केएल राहुल बाद झाला. त्यानंतर सूर्य कुमार यादवने आपले अर्धशतक झळकावले. सूर्य कुमाने ८३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने २४ तर दीपक हुड्डाने २९ धावांचे योगदाने दिले.

- Advertisement -

वेस्ट इंडिजच्या संघाने या सामन्यात अतिशय अटीतटीची लढत दिली. पण वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघा ४६ ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला. भारताने सिरीज जिंकत या वर्षाची चांगली सुरूवात केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -