घरक्रीडाटीम इंडिया उपांत्य फेरीत दाखल; आता गाठ इंग्लंडशी, द.आफ्रिकेच्या पराभवामुळे पाकला संधी

टीम इंडिया उपांत्य फेरीत दाखल; आता गाठ इंग्लंडशी, द.आफ्रिकेच्या पराभवामुळे पाकला संधी

Subscribe

मेलबर्न – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात रविवारी मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात ग्रुप 2 मधील अखेरचा साखळी सामना झाला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला.

सूर्यकुमार यादवची झंझावती बॅटींग (२५ चेंडूत ६१ धावा) आणि लोकेश राहुलच्या (3५ चेंडूत 5१ धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेसमोर 5 बाद 186 धावांचे तगडे आव्हान उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडल्याने झिम्बाब्वेचा संघ अवघ्या 115 धावांत गारद झाला.

- Advertisement -

भारताने या विजयासह ग्रुप 2 मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे, तर दुसर्‍या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केल्याने ग्रुप 2 ची समीकरणे बदलली. या पराभवामुळे द. आफ्रिका वर्ल्डकप बाहेर तर गेला असून पाकिस्तानने 5 गडी राखत बांगलादेशला नमवून उपांत्य फेरीत आश्चर्यकारकरित्या प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा पुढील सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -