घरक्रीडाशुटींग वर्ल्डकपमध्ये सौरभ चौधरीने पटकावले सुवर्ण पदक

शुटींग वर्ल्डकपमध्ये सौरभ चौधरीने पटकावले सुवर्ण पदक

Subscribe

१० मीटर एयर शुटींगच्या प्रकारात भारताच्या सैारभ चौधरीने पटकावल सुवर्ण पदक.

नवी-दिल्ली येथे सुरु असलेल्या आय.एस.एस वर्ल्डकप मध्ये शुटींग प्रकारात भारताच्या १६ वर्षीय सैारभ चौधरीने सुवर्ण पदकावर आपल नाव कोरल आहे. पुरुषांच्या १० मीटर एयर शुटींग प्रकारात सौरभने हे पदक पटकावले आहे. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे. एकूण २४५ अंक मिळवत त्याने जागतिक विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. सर्बियाच्या दामिर माइकला हरवत त्याने हे पदक मिळवले आहे. याआधी त्याने युथ ऑलंपिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

जागतिक विक्रमाला गवसणी

सौरभच्या कारकिर्दीतील हा पहिलाच सिनीयर वर्ल्डकप आहे. दरम्यान या विजयामुळे २०२० मध्ये होणाऱ्या आगामी टोकीयो ऑलम्पिकसाठी तो पात्र झाला असून स्पर्धेसाठी त्याने आपले स्थान पक्के केले आहे. सौरभची यास्पर्धेतील कामगिरी अतिशय उल्लेखनीय होती. त्याने शेवटच्या शॉट आधीच सुवर्ण पदक निश्चीत केलं होतं. शेवटच्या प्रयत्नात त्याने विश्वचषकाला गवसणी घातली.

- Advertisement -

याआधी देखील सर्वोत्तम कामगिरी

यापूर्वी देखील जुनियर श्रेणीमध्ये सौरभच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद आहे. रविवारी झालेल्या सामन्यात सौरभने सुरवातीपासूनच सर्वोत्तम खेळाच प्रदर्शन करत आघाडी कायम ठेवली. सुरवातीच्या पाच शॉट नंतर सर्बियाच्या दामिर माइकला त्याने मागे टाकले. १० व्या शॉटच्या वेळी १०२.२ गुणांसह तो पहिल्या स्थानी कायम होता. तर ९९.६ गुणांसह माईक दुसऱ्या आणि चिनचा वी पैंग तिसऱ्या स्थानी होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -