घरमहाराष्ट्रपुणेकरांना वाढत्या तापमानाचा चटका

पुणेकरांना वाढत्या तापमानाचा चटका

Subscribe

पुणे शहरामध्ये गारवा गायब झाला असून उन्हाचे चटके पुणेकरांना सहन करावे लागत आहेत. तर पुढील दोन दिवस उकाडा हा कायम राहणार असल्याच अंदाज हवामान खात्यांनी व्यक्त केला आहे.

तीन महिने गारवा अनुभवलेल्या पुणेकरांना गेल्या आठवड्याभरात कमाल तापमानाचा पारा वर चढल्याने उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. थंडीचा आनंद घेत असताना पुणेकरांना अचानक उन्हाची चाहुल लागली आहे. वातावरणातील गारवा गायब झाला असून सुर्योदयापासूनच उकाडा जाणवत असल्याच दिसत आहे. पुणे शहरात शनिवारी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. तसेच पुढचे दोन दिवस तापमान स्थिर राहणार असा अंदाज हवामान खात्यांनी वर्तविला आहे. तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे दिवसा फिरतानाही उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. तसेच हवेतील गारवा कमी होऊन तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

उबदार कपड्यांची जागा सुती कपड्यांनी घेतली

पुणेकरांना काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. या दरम्यान, शहरामध्ये चौकाचौकात टोप्या आणि गॉगलचे स्टॉल लावलेले दिसून येत आहेत. कपड्यांच्या दुकानात लावलेल्या उबदार कपड्यांची जागा सुती कपड्यांनी घेतली आहे. तसेच उन्हाळा आल्याचे मेसेजही सोशल मीडियावर फिरत आहे.

- Advertisement -

आठवड्याभरात वाढत्या तापमानाची नोंद

हवामान खात्याकडून पुणे शहराची वाढत चाललेल्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यात १७ ता. कमाल ३२.६ तर किमान १०.८ अंश सेल्सिअस तापमान होते. १८ ता. कमाल ३४.६ तर किमान ११.८अंश सेल्सिअस तापमान होते. १९ ता. कमाल ३५.९ तर किमान १३ अंश सेल्सिअस तापमान होते. २० ता. कमाल ३७.५ तर किमान १४.२ अंश सेल्सिअस तापमान होते. २१ ता. कमाल ३६.४ तर किमान १७.५ अंश सेल्सिअस तापमान होते. २२ ता. कमाल ३६.२ तर किमान १९.२ अंश सेल्सिअस तापमान होते. तसेच २३ ता. कमाल ३६.२ तर किमान १६. ६ अंश सेल्सिअस अशा पद्धतीने आठवड्याभरातील वाढत जाणाऱ्या तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -