घरक्रीडाटी-20 विश्वचषक : झिम्बाब्वेला हलक्यात घेणे भारतीय संघाच्या येऊ शकते अंगलट

टी-20 विश्वचषक : झिम्बाब्वेला हलक्यात घेणे भारतीय संघाच्या येऊ शकते अंगलट

Subscribe

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघ सध्या उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर उभी असून, झिम्बाब्वेविरुद्धचा अखेरचा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. मात्र, या सामन्यात झिम्बाब्वेला छोटा संघ म्हणून हलतक्यात घेतल्यास भारताच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघ सध्या उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर उभी असून, झिम्बाब्वेविरुद्धचा अखेरचा सामना जिंकल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. मात्र, या सामन्यात झिम्बाब्वेला छोटा संघ म्हणून हलतक्यात घेतल्यास भारताच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्याचकारण म्हणजे यंदाच्या भारताप्रमाणेच बलाढ्य असणाऱ्या पाकिस्तान संघाचा झिम्बाब्वेने पराभूत केले. या सामन्यात अखेरच्या सामन्यात 1 रनने हा सामना झिम्बाब्वेने जिंकला. शिवाय, झिम्बाब्वेच्या संघाचा इतिहास लक्षात घेतला असता त्यांनी 1983च्या विश्वचषकातही भारताचे जिंकण कठीण केले होते. मात्र माजी कर्णधार कपिल देव यांनी एक अविस्मरणीय खेळी केली नसती तर भारताने 83चा विश्वचषक जिंकला नसता. त्यामुळे या टी-20 विश्वचषकातही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला सावध खेळी करावी लागणार आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात फार कमी एकदिवसीय सामने आहेत. 2010 मध्ये झिम्बाब्वेने भारतीय संघाचा शेवटचा पराभव केला होता, तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये एकूण 14 सामने खेळले गेले आहेत आणि भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. एकूण रेकॉर्ड पाहिल्यास, दोन्ही संघांमध्ये एकूण 65 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने 53 जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेने 10 सामने जिंकले आहेत, 2 सामने टाय झाले आहेत. याचाच अर्थ की काही सामन्यात तुलनेने कमकुवत समजल्या जाणाऱ्या झिम्बावेने भारताच्या नाकात दम केला होता.

- Advertisement -

कपिल देव यांची अविस्मरणीय खेळी

- Advertisement -

क्रिकेटच्या इतिहासात भारताने पहिला विश्वचषक 1983साली माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला. 1983चा विश्वचषक भारतीय संघासाठी चढ-उतारांचा ठरला होता. मात्र या विश्वचषकात झिम्बाव्बेच्या संघाविरोधात कपिल देव यांनी केलेली खेळी अविस्मरणीय होती. कपिल देव यांच्या या खेळीची आजही क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा कायम असते. या सामन्यात 175 धावा ठोकत कपिल देव यांनी अवघड परिस्थितीतून संघाला बाहेर काढले होते. त्यावेळी कपिल 175 धावांची खेळी करू शकले कारण त्यांना सय्ययद किरमाणी यांनी उत्तम साथ दिली होती. जर सय्ययद किरमाणी त्यांना साथ देत नाहीत आणि कपिल देव 175 धावा करत नाहीत, तर भारताला विश्वचषक जिंकणे कठीण झाले असते. त्यावेळी “मी कपिल देव यांना साथ दिली नसती तर भारत विश्वचषक जिंकू शकला नसता” असे सय्यद किरमाणी यांनी सांगितले होते.

कपिल देव यांची मोलाची खेळी

वनडे सामना 60 षटकांचा सामना व्हायचा. भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 8 बाद 266 धावा केल्या होत्या. यामध्ये कपिल देव यांच्या नाबाद 175 धावा होत्या. यावेळी सय्यद किरमानी यांनी 24 धावा केल्या होत्या. या दोघांनी 9व्या विकेटसाठी विक्रमी भागादीरी केली होती. कपिल देव यांच्या 138 चेंडूत 16 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 175 धावा केल्या. या खेळीत त्यांचा स्ट्राइक रेट 126.81 इतका होता.

1983च्या विश्वचषकानंतर 1996 – 97 मध्ये झालेल्या झिम्बावेविरूद्धच्या मालिकेत भारताला 1-0 असा मालिका पराभव देखील सहन करावा लागला होता. त्यानंतर 1999 च्या विश्वचषकातही झिम्बावेने भारताचा 3 विकेट्सनी पराभव केला होता.

भारतासमोर मोठे आव्हान

सध्या झिम्बावेच्या काही खेळाडूंनी भारताविरूद्ध दमदार कामगिरी केली आहे. आताच्या झिम्बावे संघात देखील काही असे खेळाडू आहेत जे भारतासमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात. त्यानुसार, भारत आणि झिम्बावेच्या सामन्यात झिम्बावेच्या सिकंदर रझावर सर्वांची नजर असणार आहे. कारण रझा हा चांगल्या धावा करत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी झालेल्या बांगलादेश विरूद्धच्या वनडे मालिकेत सिकंदर रझा याने 2 सामन्यात 2 शतकी खेळी केल्या. त्याने सलग दोन सामन्यात दोन 53 शतके ठोकली.

पाकिस्तानाचा पराभव करून झिम्बाब्वेचा आत्मविश्वास वाढला

यंदाच्या टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या समान्यात झिम्बाब्वेने 1 रननी पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यातील अखेरच्या षटकात विजयाचे समीकरण 6 चेंडूत 11 असे झाले. मात्र झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्सने अशी गोलंदाजी केली त्याने इतिहास घडला. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर पाकिस्तानने 3 धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. त्यानंतर 3 चेंडूत 3 धावांची गरज असताना ब्रॅडने निर्धाव चेंडू टाकला. त्यानंतर 2 चेंडूत 3 धावा हव्या असताना नवाझ झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना शाहिन आफ्रिदाने चेंडू मारला आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्नात धावबाद झाला आणि झिम्बाब्वेने मॅच जिंकली.

नाहीतर सरस रनरेटच्या जोरावर पाकिस्तान उपांत्य फेरीत

दरम्यान, टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या प्रवेशाचा विचार केला असता, भारताच्या दृष्टीकोणातून झिम्बाब्वेचा सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. कारण पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला मात देऊन आपले रनरेट देखील सुधारले आहे. जर भारत आजचा सामना हरला आणि पाकिस्तानने बांगलादेशला मात देत 2 गुणांची कमाई केली, तर भारत आणि पाकिस्तान समान 6 गुणांवर येतील आणि सरस रनरेटच्या जोरावर पाकिस्तान उपांत्य फेरीमध्ये पोहचेल. याच परिस्थितीत जर दक्षिण आफ्रिका नेदरलँडकडून पराभूत झाली तर मात्र पाकिस्तान आणि भारत सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे.

सध्याची दोन्ही गटातील स्थिती

अ गटातून न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस होईल अशी अपेक्षा होती. मात्र अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी सामना जिंकला मात्र अफगाणिस्तानने कडवे आव्हान देऊन संघाच्या यजमान संघाच्या अडचणीत वाढ केली आहे.

ब गटातून भारतीय संघ 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत उपांत्य फेरी गाठणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र भारत ब गटातून दुसऱ्या स्थानावर राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंडविरूद्ध होईल. याशिवाय भारत जर अव्वल स्थानावरच राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासोबत होण्याची शक्यता आहे.

ब गटातील उद्याचे सामने

  • दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड्स
  • भारत वि. झिम्बाब्वे
  • पाकिस्तान वि. बांगलादेश

टी-20 विश्वचषक 2022 गुणतालिका अ गट

संघ              सामने      विजय      पराभव    अनिर्णित    गुण      NRR
न्युझीलंड          4           2           1          1          5     +2.233
इंग्‍लंड             4           2           1          1          5     +0.547
ऑस्ट्रेलिया        4           2            1         1          5      -0.304
श्रीलंका           4           2            2         0           4     +0.457
आयरलँड         4          1            2         1           3      -1.544
अफगाणिस्तान    4          0            2         2           2      -0.718

टी-20 विश्वचषक 2022 गुणतालिका अ गट

संघ           सामने       विजय        पराभव      अनिर्णित    गुण       NRR
भारत           4            3             1            0            6      +0.746
आफ्रिका       4            2             1            1            5     +1.441
पाकिस्‍तान      4           2              2            0            4      +1.117
बांगलादेश      4           2             2             0            4      -1.276
झिंबाब्वे         4            1            2             1            3      -0.313
नेदरलँड        4           1             3             0            2      -1.233

झिम्बाब्वे : क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाबवा (विकेटकीपर), वेस्ली माधेवेरे, सीन विल्यम्स, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, रायन बुर्ले, ल्यूक जोंगवे, रिचर्ड नागरवा, तेंडाई चतारा आणि ब्लेसिंग मुजरबानी.


हेही वाचा – Virat Kohli 34th Birthday : आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कोहलीच्या नावे सर्वाधिक विक्रमांची नोंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -