घरक्रीडाT20 world cup 2021 : भारत अजूनही गाठू शकतो उपांत्य फेरी; जाणून...

T20 world cup 2021 : भारत अजूनही गाठू शकतो उपांत्य फेरी; जाणून घ्या काय आहे समीकरण

Subscribe

काही अपवाद वगळले तर भारतीय संघाला अजूनही उंपात्य फेरी गाठण्याची संधी असल्याची चिन्हं आहेत

भारतीय संघाला आयसीसी टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ मध्ये रविवारी सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गडी राखून दारूण पराभव केला. तर याअगोदरच्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला १० गडी राखून धूळ चारली होती. सलग २ झालेल्या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पण भारतीय संघाची उपांत्य फेरी गाठण्याची संधी अजुनही गेलेली नाही.

रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या आक्रमक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी पूर्णत: अपयशी झाल्याचे ठरली. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना फक्त ११० घावांपर्यंतच मजल मारता आली. बदल्यात न्यूझीलंडने अगदी सहज १४.३ षटकांत २ बळी गमावून सामन्यावर विजय मिळवला. “करो या मरोच्या” सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाने अडचणीत वाढ झाली आहे. तर न्यूझीलंडचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग सुखकर झाला आहे.

- Advertisement -

भारताला मोठ्या फरकाने जिंकावे लागणार पुढील सामने

आता भारतीय संघाचा अफगाणिस्तान, स्कॉटलँड आणि नामिबियाच्या संघाशी सामना होणार आहे. ३ नोव्हेंबरला आफगाणिस्तान, ५ नोव्हेंबरला स्कॉटलँड तर ८ नोव्हेंबरला नामिबिया सोबत भारतीय संघ मैदानात असणार आहे. या तीनही सामन्यात भारतीय संघाला कमीत कमी ७० हून जास्त धावांच्या विजयाची गरज आहे, अशा फरकाने विजय मिळाल्यास भारतीय संघ आपला नेट रन रेट सुधारून उपांत्य फेरी गाठू शकतो.

भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी स्कॉटलँड आणि नामिबियाच्या संघाकडून मोठी अपेक्षा असणार आहे. जर क्वालिफायर होऊन सुपर १२च्या फेरीत नामिबिया आणि स्कॉटलँडचा संघ पोहचला तर त्या दोन्ही संघाकडून न्यूझीलंडच्या संघाचा पराभव भारतीय संघासाठी फायदेशीर असणार आहे. आताच्या समीकरणानुसार भारतीय संघ ३ सामने जिंकून ६ अंकापर्यंत पोहचू शकतो. भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि अफगाणिस्तानचा न्यूझीलंडजकडून पण पराभव झाला तर अफगाणिस्तानच्या खात्यात केवळ ४ अंक राहतील. तर न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि स्कॉटलँड किंवा नामिबियाच्या संघाकडून न्यूझीलंड पराभूत झाले तर न्यूझीलंडच्या खात्यात जास्तीत जास्त ६ गुण राहतील. यासगळ्यानंतर देखील भारतीय संघाचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा जास्त राहिला तर भारतीय संघ पुढे पोहचू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा –T20 WC IND vs NZ : न्यूझीलंडचा सहज विजय; भारताचा वर्ल्डकपमधील पुढील प्रवास खडतर

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -