घरक्रीडाIPL 2021 : धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार -...

IPL 2021 : धोनीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार – मायकल वॉन

Subscribe

धोनी यंदाच्या किंवा पुढील मोसमानंतर निवृत्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, तो अजूनही आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. धोनीला आयपीएलच्या मागील मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही आणि यंदाही त्याला धावांसाठी झुंजावे लागत आहे. त्यामुळे धोनी यंदाच्या किंवा पुढील मोसमानंतर निवृत्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून धोनीच चेन्नईचे नेतृत्व करत असल्याने त्याच्यानंतर कर्णधारपदी कोणाची निवड होणार? असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनच्या मते चेन्नईने अष्टपैलू रविंद्र जाडेजाची कर्णधारपदी निवड करण्याचा विचार केला पाहिजे.

धोनी लवकर निवृत्त होईल

धोनी आणखी दोन-तीन वर्षे खेळू शकेल असे काही लोक म्हणत आहेत. मात्र, मी या मताशी सहमत नाही. माझ्या मते, तो लवकर निवृत्त होईल. त्यामुळे चेन्नईला धोनीनंतरचा विचार सुरु करावा लागणार आहे. चेन्नईने रविंद्र जाडेजाच्या भोवती संघबांधणी करावी असे मला वाटते. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये योगदान देतो. तसेच तो मानसिकदृष्ट्या कणखर आहे, असे वॉन म्हणाला.

- Advertisement -

अधिक जबाबदारी घेण्यासाठी तयार

जाडेजा हा असा खेळाडू आहे, ज्याला तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकता. तसेच गोलंदाजीत तो डावाचे पहिले षटकही टाकू शकतो. तो मैदानात कुठेही चांगले क्षेत्ररक्षण करतो. त्यामुळे तो अधिक जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे असे मला वाटते. तो अप्रतिम खेळाडू आहे, असेही वॉनने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -