घरक्रीडाIPL 2021 MI vs CSK : मुंबईची गोलंदाजी; जिमी निशम, धवल कुलकर्णीला...

IPL 2021 MI vs CSK : मुंबईची गोलंदाजी; जिमी निशम, धवल कुलकर्णीला संधी 

Subscribe

मुंबईने वेगवान गोलंदाज नेथन कुल्टर-नाईल आणि ऑफस्पिनर जयंत यादवला संघातून बाहेर केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये सामना होत आहे. दिल्लीच्या फिरोझ शहा कोटला मैदानावर होत असलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. मुंबईकर वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशमला मुंबईने संधी दिली आहे. त्यांना संघात स्थान देताना मुंबईने वेगवान गोलंदाज नेथन कुल्टर-नाईल आणि ऑफस्पिनर जयंत यादवला संघातून बाहेर केले आहे. मुंबईच्या संघात निशम, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्ट असे चार परदेशी खेळाडू आहेत.

चेन्नईच्या संघात बदल नाही

मुंबईने आपल्या मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचा सलग दुसरा आणि यंदा सात सामन्यांत चौथा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे चेन्नईने यंदा अप्रतिम खेळ करताना सहा पैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांनी या सामन्यासाठी संघात बदल करणे टाळले आहे. चेन्नईने फॅफ डू प्लेसिस, मोईन अली, सॅम करन आणि लुंगी इंगिडी असे चार परदेशी खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -