घरक्रीडाIPL 2021 : उर्वरित मोसमासाठी RCB संघात मोठे बदल; पाच परदेशी खेळाडू...

IPL 2021 : उर्वरित मोसमासाठी RCB संघात मोठे बदल; पाच परदेशी खेळाडू आऊट, तीन इन

Subscribe

बंगळुरूचे प्रशिक्षक सायमन कॅटीच त्यांच्या पदावरून पायउतार झाले आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा उर्वरित मोसम १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत युएई येथे पार पडणार आहे. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. बंगळुरूचे पाच परदेशी खेळाडू उर्वरित मोसमाला मुकणार असून त्यांच्या जागी तीन बदली खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लेगस्पिनर वानिंदु हसरंगा आणि वेगवान गोलंदाज दुष्मन्थ चमीरा या श्रीलंकन खेळाडूंसह सिंगापूरच्या टीम डेविडला बंगळुरूने उर्वरित आयपीएल मोसमासाठी करारबद्ध केले आहे. न्यूझीलंडचे फिन अ‍ॅलन आणि स्कॉट कुगलायन, तसेच ऑस्ट्रेलियाचे केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स आणि अ‍ॅडम झॅम्पा हे बंगळुरूचे पाच खेळाडू विविध कारणांनी उर्वरित मोसमाला मुकणार आहेत.

बदली खेळाडूंची निवड करणे भाग पडले

आम्ही संघात मोठे बदल केले आहेत. आमचे काही परदेशी खेळाडू उपलब्ध नसल्याने आम्हाला हे बदल करावे लागले आहेत. फिन अ‍ॅलन आणि स्कॉट कुगलायन यांची न्यूझीलंडच्या संघात (बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱ्यासाठी) निवड झाली आहे. त्यामुळे ते उर्वरित आयपीएल मोसमात खेळू शकणार नाहीत. केन रिचर्डसन आणि डॅनियल सॅम्स यांनी उर्वरित मोसमात खेळणार नसल्याचे आम्हाला कळवले आहे. त्यामुळे आम्हाला बदली खेळाडूंची निवड करणे भाग पडले आहे, असे बंगळुरूचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले.

- Advertisement -

हसरंगाच्या समावेशाने संघ संतुलित

आम्ही झॅम्पाच्या जागी वानिंदु हसरंगाची निवड केली आहे. हसरंगाच्या समावेशाने आमचा संघ संतुलित झाला आहे. तो चांगला लेगस्पिनर असून फलंदाजीची करू शकतो, असे हेसन म्हणाले. हसरंगाने मागील काही काळात श्रीलंकेकडून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सर्वाधिक सात विकेट घेतल्या होत्या. सध्या टी-२० क्रमवारीत गोलंदाजांमध्ये हसरंगा दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच बंगळुरूचे प्रशिक्षक सायमन कॅटीच त्यांच्या पदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी हेसन बंगळुरूचे प्रशिक्षकपद भूषवतील.


हेही वाचा – IPL 2021 : ‘हा’ ऑस्ट्रेलियन गोलंदाज पंजाब किंग्सच्या ताफ्यात

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -