घरक्रीडाIPL 2022 award winners List : गुजरातने कमावले २० कोटी, तर जोस...

IPL 2022 award winners List : गुजरातने कमावले २० कोटी, तर जोस बटलर ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता खेळाडू

Subscribe

गुजरातने जेतेपदावर कब्जा केला असला तरी, उपविजेता संघ राजस्थानही पुरस्कारांच्या यादीत अव्वल राहिला आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले आहेत.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचे जेतेपद नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पटकावले. अष्टपैलू व कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातच्या संघाने त्याच्याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सहज पराभव केला. दरम्यान गुजरातने जेतेपदावर कब्जा केला असला तरी, उपविजेता संघ राजस्थानही पुरस्कारांच्या यादीत अव्वल राहिला आहे. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याला सर्वाधिक 6 पुरस्कार मिळाले आहेत.

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर झालेल्या आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 131 धावांचे आव्हान गुजरातला दिले.

- Advertisement -

राजस्थानच्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला फारशी चांगली सुरूवात करता आली नाही. मात्र, कर्णधार हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेले. ही जोडी विजेतेपदापर्यंत पोहचेल असे वाटत असताना हार्दिक पंड्या 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने शुभमनच्या साथीने संघाला आयपीएलचे विजेतपद पटकावले.

आयपीएल 2022 च्या पुरस्कारांची यादी :

- Advertisement -
  • विजेता – गुजरात टायटन्सन – 20 कोटी
  • उप विजेता – राजस्थान रॉयल्स – 12.5 कोटी
  • ऑरेंज कॅप विजेता – जोस बटलर (836 धावा) – 10 लाख
  • पर्पल कॅप विजेता – युजवेंद्र चहल (27 विकेट्स) – 10 लाख
  • सर्वाधिक षटकार – जोस बटलर (45) – 10 लाख
  • सर्वाधिक चौकार – जोस बटलर (83) – 10 लाख
  • Most Valuable Player – जोस बटलर – 10 लाख
  • Emerging Player of the Year – उम्रान मलिक – (22 विकेट्स) – 20 लाख
  • Game-changer of the season – जोस बटलर ( 1318 गुण) – 10 लाख
  • Super striker of the season – दिनेश कार्तिक – 10 लाख आणि टाटा पंच गाडी
  • Power player of the season – जोस बटलर – 10 लाख
  • Fair play award – राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स
  • Fastest delivery of the season- ल्युकी फर्ग्युसन – 10 लाख
  • Catch of the season – एव्हिन लुईस – 10 लाख

हेही वाचा – IPL Final 2022: गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएलच्या जेतेपदावर कोरले नाव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -