घरक्रीडाIPL 2022: आयपीएलमध्ये रवि शास्त्री दिसणार समालोचकाच्या भूमिकेत, प्रशिक्षक पदापासून घेणार विश्रांती

IPL 2022: आयपीएलमध्ये रवि शास्त्री दिसणार समालोचकाच्या भूमिकेत, प्रशिक्षक पदापासून घेणार विश्रांती

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी आगामी आयपीएल हंगामात कोणत्याही संघाचे प्रशिक्षक होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर आयपीएलमधील नविन संघ अहमदाबादचे प्रशिक्षक होतील अशी चर्चा होती. परंतु रवि शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे की, ते आता कोचिंग करणार नसून समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. समालोचक करण्यात जास्त आवड असल्याचेही रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.

माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांना प्रशिक्षकाप्रमाणेच उत्तम समालोचक म्हणूनही ओळखलं जाते. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्त होण्यापुर्वी ते समालोचन करत होते. आयपीएल २०२२ च्या हंगामात रवि शास्त्री समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे. शास्त्री सध्या बायो-बबलमधून बाहेर आले आहेत. यामुळे लगेच पुन्हा बायो-बबलमध्ये जाण्याची त्यांची इच्छा नाही. थोडी मोकळीक हवी असल्याचे रवि शास्त्री म्हणाले. तसेच अद्याप कोणत्याही संघासोबत चर्चा झाली नाही. सध्या विश्रांत घेणार असून लवकरच टीव्हीवर समालोचन करण्याच्या भूमिकेत दिसेल आणि ते मला आवडते असे रवि शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

अहमदाबादचे प्रशिक्षक कोण होणार?

आयपीएल २०२२ च्या हंगामात अहमदाबाद संघाचे प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचे गैरी कर्स्टन यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडे भारतीय संघासोबत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून अनुभव आहे. तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याच्याही नावाची चर्चा आहे.


हेही वाचा : हरभजन सिंगचा क्रिकेट जगताला अलविदा, राजकीय इनिंग सुरू करण्याची शक्यता

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -