घरलाईफस्टाईलChristmas 2021: या 5 प्रकारच्या डेझर्ट्सने ख्रिसमसला बनवा आणखी खास

Christmas 2021: या 5 प्रकारच्या डेझर्ट्सने ख्रिसमसला बनवा आणखी खास

Subscribe

डिसेंबरचा महिना अनेक प्रकारे खास असतो. या शेवटच्या महिन्यात ख्रिसमस (Christmas 2021) हा सण मोठ्या उत्साहात अनेकजण साजरा करतात. 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा वाढदिवस असतो. अनेक ख्रिश्चन बांधव या दिवशी घर सजवतात तसेच ख्रिसमस ट्री आणून त्यांच्यावर अतिशय सुंदर प्रकारे लाईटींग करतात. कोल्ड ड्रींक्स, स्वादीष्ट पदार्थ, गोडधोड मिठाई या सर्वांची रेलचेल अनेकांच्या घरात पाहायला मिळते. प्रत्येक सणाच्या दिवशी बाजारपेठांमध्ये  खरेदीसाठी लोकांची गर्दी देखील पाहायला मिळेत. यावर्षी सुद्धा सरकारने कोरोनाचे नियम पाळूनच यंदाचा ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्याचे आवाहान नागरिकांना केलं आहे. मात्र घरच्यांसोबत हा सण तुम्ही उत्साहाने साजरा करु शकतात आणि हा दिवस नक्कीच खास बनवू शकतात.

ख्रिसमसच्या दिवशी केक हा सर्वात महत्वपूर्ण पदार्थ आवर्जुन असतो. अनेकजण घरच्या घरी टेस्टी केक बनवून ख्रिसमस सेलिब्रेट करतात. आज आपण केकचे काही विशिष्ट आणि खास प्रकार जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

बुश डे नोएल-

बुश डे नोएल हा फ्रांसमधील अतिशय टेस्टी पदार्थ असून हा केक एका चॉकलेट रोल प्रमाणे असतो. हे ख्रिसमस चॉकलेट रोल अत्यंत टेस्टी असतात.

रम केक-

हिवाळ्यामध्ये अनेकजन रमचं सेवन करतात. यामुळे आपल्या शरिराला उष्णता मिळते. जर तुम्ही केक बनवताना नेमक्या मोजमापात रम अॅड केल्यास हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. मात्र याला 15 दिवसांपूर्वीच रममध्ये याला भिजवून ठेवण्यात येते. यानंतर फळांना केक बॅटरमध्ये मिक्स केलं जातं.

- Advertisement -

फिग पुडिंग-

तुम्ही नेहमची रम केक किंवा प्लम केक बनवत असला तर यंदा ख्रिसमला फिग पुडिंग ट्राय करा. हे अंजीर पासून तयार करण्यात येतं. हा केक काहीसा हलका आणि ओला असतो. यामध्ये जायफळ , दालचीनी आणि संत्रीचा रस मिक्स केला जातो.

क्रेनबेरी – टॉफी डेट केक-

ज्या व्यक्तींना गोड खाने सर्वाधीक आवडते त्यांच्यासाठी हे एक उत्तम डिझर्ट ठरेल. हा केक खातांना तुम्हाला क्रेनबेरीज, मीठ आणि कॅरमलचा अल्हाददायक स्वादचा अनुभव मिळेल.

ऐप्रोल ख्रिसमस केक-

ख्रिसमसमध्ये रमकेक नंतर ऐप्रोल केक खाण्यास सर्वाधिक लोकांना आवडेते. यामद्ये कॉकटेल चेरीज, संत्र्याचा रस आणि किशमिश मिक्स केले जातात.

वरील सर्व स्वादिष्ट केकची रेसिपी तुम्हाला इंटरनेटवर नक्कीच मिळेल


हे हि वाचा –  Nutrition Tips: ब्रँडी, रम नाही तर ‘हे’ पेय ठेवेल हिवाळ्यात शरीर उष्ण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -