घरक्रीडाIPL 2022: दिनेश कार्तिक, शाहबाज अहमदची उत्कृष्ट खेळी; बंगळुरूचा ४ गडी राखून...

IPL 2022: दिनेश कार्तिक, शाहबाज अहमदची उत्कृष्ट खेळी; बंगळुरूचा ४ गडी राखून राजस्थानवर विजय

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या १२ व्या सामन्यात बंगळुरूचा विजय झाला. शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं दिलेले १६९ धावांचं लक्ष्य बंगळुरुनं पार करत राजस्थानला पराभूत केलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या १२ व्या सामन्यात बंगळुरूचा विजय झाला. शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं दिलेले १६९ धावांचं लक्ष्य बंगळुरुनं पार करत राजस्थानला पराभूत केलं. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलरनं संघासाठी ७० धावा केल्या. पण क्षेत्ररक्षणावेळी गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं बटलरच्या या फलंदाजीचा काहीच फायदा झाला नाही.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी ऐनवेळी बहारदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं १६९ धावा केल्या. १७० धावांचं लक्ष्य गाठताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात चांगली झाली. बंगळुरुचा पहिला फलंदाज ५५ धावांवर बाद झाला. सलामीला आलेल्या फाफ डू प्लेलीसनं २० चेंडूमध्ये पाच चौकार यांच्या मदतीने २९ धावा केल्या. त्यानंतर मात्र बंगळुरुचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले.

- Advertisement -

बंगळुरु संघ ६१ धावांवर असताना फलंदाजीसाठी आलेला अनुर रावत २५ चेंडूंमध्ये केवळ २६ धावा करु शकला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला विराट कोहली विचित्र पद्धतीनं धावबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूमध्ये युजवेंद्र चहलने डेविड वेल्लीला शून्यावर बाद केलं. डेविड वेल्ली शून्यावर बाद झाल्यानंतर शेरफेन रुदरफोर्डने १० चेंडू खेळून फक्त पाच धावा केल्या. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर रुदरफोर्ड झेलबाद झाला.

त्यानंतर मात्र शाहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक यांनी संघाला चांगल्या प्रकारे सावरलं. दोघांनीही संधी मिळताच चौकर आणि षटकार लगावले. तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जैसवाल सलामीला आहे. जोस बटलरने (नाबाद) सुरुवातीपासून धडाकेबाज खेळ करत ४७ चेंडूंमध्ये सहा षटकार लगावत ७० धावा केल्या.

- Advertisement -

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे गोलंदाज आपली जादू दाखवू शकले नाहीत. पूर्ण डावात राजस्थानचे फक्त तीन फलंदाज बाद झाले. विल्ले, आकाश, वानिंदू हासरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. विल्लेने जैसवालचा तर हर्षल पटेलने पडिक्कलची आणि हसरंगाने सॅमसनला बाद केलं. सिराजने चार षटकांत ४३ धावा दिल्या. आकाश दीपने चार षटकांत ४४ धावा दिल्या.

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बंगळुरु ५५ धावांवर असताना फाफ डू प्लेसिसच्या रुपात राजस्थानला पहिला बळी मिळला. त्यानंत ठराविक अंतरावार बगंळुरुचे फलंदाज बाद होत गेले. युजवेंद्र चहलने विराट कोहली आणि डेविड वेल्ली यांना बाद करून आपलं काम चोख पद्धतीने केलं. ट्रेंट बोल्टनेदेखील ४ षटकांत ३४ धावा देत दोन फलंदाजांना बाद खेलं. नवदीप सैनीने तीन षटकांमध्ये ३६ धावा देत एका फलंदाजाला बाद केलं.


हेही वाचा – ‘मी डोलकर’ गाण्यावर सचिन तेंडुलकरचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -