घरमनोरंजनसई ताम्हणकर 'या' व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये? ‘दौलतराव’ टॅग देत फोटो केला पोस्ट

सई ताम्हणकर ‘या’ व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये? ‘दौलतराव’ टॅग देत फोटो केला पोस्ट

Subscribe

मराठी सिनेसृष्टीत आज सर्वात आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरचे नाव घेतले जाते. सई सोशल मीडियावर खूप सक्रिय असले. अनेक फोटो आणि व्हि़डीओच्या माध्यमातून चाहत्यांनी ती आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. मात्र सई ताम्हणकरच्या एका ताज्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमधून चाहत्यांना तिने सुखद धक्का दिला आहे.

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. मात्र या पोस्टमध्ये सईने स्वत:चा नाही तर तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. हा खास व्यक्ती म्हणजे चित्रपट निर्माता अनिश जोग. हा फोटो पोस्ट करत सईने कॅप्शनमध्ये लिहिले की, “देवा! मी कशाप्रकारे तुला ब्लश करायला भाग पाडते नं..!”. यासोबतच सईने #one #saheb #daulatrao असे काही हॅशटॅग्ज वापरले आहेत. या पोस्टमुळे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहे. खरं तर सई आणि अनिश अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आहेत. मात्र दोघांपैकी कोणीही रिलेशनशिपवर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे ही पोस्ट सईने कोणत्या मूव्ही प्रमोशनसाठी केली नाही असाही सवाल चाहते उपस्थित करत आहेत.

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

- Advertisement -


मात्र या पोस्ट खाली आता अनेक युजर्स हा फोटोतील व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. चाहत्यांसोबत आता अनेक कलाकार देखील सईच्या पोस्टखाली कमेंट्स करत आहेत. अभिनेत्री या बापट, वैभव तत्ववादी, सुयश टिळक आणि प्रार्थना बेहेरे यांनी देखील कमेंट केली आहे. प्रियाने कमेंट करत ती कमेंट अनिश जोगलाही टॅग केली आहे.

विशेष म्हणजे अनिशनेही गेल्या महिन्यात त्याचा आणि सईचा एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. या फोटोसह कॅप्शनमध्ये त्याने- जादू! #youandme असे लिहिले होते. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्नात अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांने हा फोटो क्लिक केला होता. त्या फोटोवर देखील प्रिया बापटने “क्या बात है,” अशी कमेंट केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anish Joag (@anishjoag)

- Advertisement -

दरम्यान अनिश जोग आणि सई ताम्हाणकर चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. अनिश आणि सईने अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेय. यात गर्लफ्रेंड, धुरळा, YZ, टाइम प्लीज अशा चित्रपटांची निर्मिती अनिश जोगने केली आहे.

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील या पिढीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. फिल्मी कारकिर्दीव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली. अभिनेत्रीने 2013 मध्ये अतुल गोसावीसोबत लग्न केले, मात्र काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून तिचे नाव विविध लोकांशी जोडले गेले. मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतानाही सईने गप्प राहणे पसंत केले.


Lock Upp : पूनम पांडेने कंगनाच्या शोमध्ये दिलेले ‘हे’ वचन केले पूर्ण

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -