घरक्रीडाखेळाडूंच्या दुखापतीमुळे मुकला कालचा सामना; हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी म्हणतात...

खेळाडूंच्या दुखापतीमुळे मुकला कालचा सामना; हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी म्हणतात…

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. काल झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला. मात्र या पराभवानंतर हैदराबादच्या आणखी एक धक्का बसला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. काल झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा पराभव झाला. मात्र या पराभवानंतर हैदराबादच्या आणखी एक धक्का बसला आहे. कारण दुखापतीमुळे कालचा सामना मुकलेला वॉशिंगटन सुंदर दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही बाहेर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीत कायम असून, गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. याबाबत हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले आहे की, वॉशिंग्टन सुंदर ज्या हाताने गोलंदाजी करतो त्याच हाताला पुन्हा दुखापत झाली आहे. त्यामुळे तो चेन्नईविरुद्ध गोलंदाजी करू शकला नाही. वॉशिंग्टनने त्याच्या गोलंदाजीच्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे 3 सामन्यांतून बाहेर पडल्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध पुनरागमन केले होते.

- Advertisement -

चेन्नईविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना पुन्हा त्याच हाताला दुखापत झाली. कालच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मूडी म्हणाले की, “सुंदरच्या गोलंदाजीच्या हाताला झालेली दुखापत दुर्दैवी आहे. दुखापत आधी पूर्णपणे बरी झाली होती, पण तोच हात पुन्हा दुखावला गेला. टाके घालण्याची गरज नाही. दुखापतीमुळे वॉशिंग्टन गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नव्हता आणि याचा परिणाम गोलंदाजीवर झाला.”

एवढेच नाही तर टी नटराजनही दुखापतीमुळे चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मैदानाबाहेर गेला होता. अशा स्थितीत कर्णधार केन विल्यमसनला एडन मार्कराम आणि शशांक सिंग यांच्याकडून गोलंदाजी करावी लागली. दोघांनीही चार षटकात एकूण ४६ धावा दिल्या.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: शाहरुख खानचा मोठा निर्णय; ‘या’ ठिकाणी बांधणार स्टेडीयम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -