घरमनोरंजनऋतिक रोशन आणि सुजैन खान झाले मुलांसोबत एकत्र स्पॉट

ऋतिक रोशन आणि सुजैन खान झाले मुलांसोबत एकत्र स्पॉट

Subscribe

नुकताच त्यांचा मुलगा रिदान रोशनचा वाढदिवस पार पडला. त्याचं निमित्ताने ऋतिक आणि सुजैनला त्यांच्या मुलांसोबत एकत्र स्पॉट झाले.

ऋतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुजैन खान त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. पूर्वी दोघांकडे एक आदर्श पती-पत्नी म्हणून पाहिलं जात होतं. परंतु त्यांच्या घटस्फोटानंतर दोघांनी आपले नवे मार्ग निवडले. आता ऋतिकचे नाव त्याची नवीन गर्लफ्रेंड सबा आजाद हिच्याशी जोडले जाते आणि सुजैनचे नाव अरसल गोनी याच्याशी जोडले जाते. मात्र कधी कधी ऋतिक आणि सुजैन त्यांच्या मुलांमुळे एकत्र दिसून येतात. नुकताच त्यांचा मुलगा रिदान रोशनचा वाढदिवस पार पडला. त्याचं निमित्ताने ऋतिक आणि सुजैनला त्यांच्या मुलांसोबत एकत्र स्पॉट झाले.

ऋतिक आणि सुजैन मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅमिली लंचसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. याच वेळी ते रेस्टॉरंटमधून बाहेर येतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वायरल होत आहे. यावेळी ऋतिकने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम पँट घातली होती. तर सुजैनने सफेद आणि पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा टॉप घातला होता त्यासोबतचं निळ्या रंगाची जीन्स घातली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडीऐओमध्ये सुजैन खान कारच्या दिशेने जात आहे, तिच्या मागे ऋतिक त्याचा मुलगा सुद्धा जाताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट केली आहे, “घटस्फोट झाल्यानंतरही दोघ एकत्र फिरत आहेत, बॉलिवूडवाल्यांचा वेगळाच जलवा आहे.”, अजून एकजण म्हणाला “लग्नाचा खेळ मांडला आहे या लोकांनी”

- Advertisement -

 

 

व्यायाम करताना झाला होता त्रास; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -