घरक्रीडाIPL 2024 : सतराव्या पर्वात लखनऊ पहिला विजय मिळवण्याच्या तयारीत, पंजाबविरोधात लढत

IPL 2024 : सतराव्या पर्वात लखनऊ पहिला विजय मिळवण्याच्या तयारीत, पंजाबविरोधात लढत

Subscribe

आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. आजचा (ता. 30 मार्च) 11 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणार आहे.

लखनऊ : आयपीएलच्या 17 व्या पर्वाला 22 मार्चपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. आजचा (ता. 30 मार्च) 11 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये होणार आहे. लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आजचा सामना खेळवला जाणार आहे. पण आज सर्वांचे लक्ष हे लखनऊच्या संघाकडे लागले असून किमान आजतरी हा संघ विजयाचे खाते उघडणार का? असा प्रश्न लखनऊ संघाच्या चाहत्यांना पडला आहे. कारण यंदाच्या हंगामातील लखनऊचा हा दुसरा, तर पंजाबचा तिसरा सामना आहे. तर पहिल्याच सामन्यात लखनऊच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IPL 2024: Kante Ki Takkar will be held in Lucknow vs Punjab)

हेही वाचा… IPL 2024: RR vs DC सामन्यात ऋषभ पंतचा संयम सुटला, रागात भिंतीवर आदळली बॅट; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

लखनऊ संघाचा पहिला सामना हा राजस्थान रॉयल्ससोबत झाला होता. त्यावेळी लखनऊला राजस्थान रॉयल्सकडून 20 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात कृणाल पंड्या वगळता लखनऊच्या सर्वच गोलंदाजांनी निराशा केली. आता हंगामातील पहिला विजय मिळवायचा झाल्यास, लखनऊच्या गोलंदाजांना पंजाबविरुद्ध प्रभाव पाडावा लागेल. परंतु, मार्क वूड आणि डेव्हिड विली यांच्या अनुपस्थितीत लखनऊची गोलंदाजी कमकुवत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे मोहसिन खान, नवीन उल हक आणि यश ठाकूर या वेगवान गोलंदाजांवर अतिरिक्त जबाबदारी आहे.

लखनऊकडे शमार जोसेफला खेळवण्याचा पर्याय आहे. तसेच आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने लखनऊचा लेग-स्पिनर रवी बिश्नोई आणि कर्णधार केएल राहुल यांच्यासाठी यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बिश्नोईला कामगिरी उंचवावी लागेल. पहिल्या सामन्यात राहुलने यष्टिरक्षण करतानाच सलामीला येण्याचा निर्णय घेतला. त्याने अर्धशतकही साकारले. त्याचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. त्याचा साथीदार क्विंटन डिकॉक, देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन यांचे योगदानही लखनऊसाठी महत्त्वाचे ठरेल.

- Advertisement -

तर, शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबच्या संघाने चंडिगड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला नमवले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडून हार पत्करावी लागली. लखनऊविरुद्ध विजयी पुनरागमनाचा त्यांचा प्रयत्न असेल. पण पंजाब किंग्ज संघाला ‘पॉवरप्ले’मधील आपली धावगती वाढवणे आवश्यक आहे. विशेषत: जॉनी बेअरस्टोने आक्रमक शैलीत खेळतानाच कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे. त्याला धवनची साथ मिळाल्यास पंजाबच्या मधल्या फळीवरील दडपण कमी होईल. डावखुऱ्या धवनने गेल्या सामन्यात बंगळूरुविरुद्ध 45 धावा केल्या होत्या. त्यामुळे आज एक संघ आपले विजयाचे खाते खोलण्याचा प्रयत्न करणार असून दुसरा संघ विजयी पुनरागमनाचा प्रयत्न करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -