घरमहाराष्ट्रWeather Update : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तापमानातही होणार वाढ

Weather Update : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तापमानातही होणार वाढ

Subscribe

येत्या काही दिवसात आणखी वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय होणार असल्याने याचा परिणाम हवामानात दिसून येईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई : येत्या काही दिवसांत राज्यातसह देशाच्या विविध भागातील तापमानात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसात आणखी वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रीय होणार असल्याने याचा परिणाम हवामानात दिसून येईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर, पश्चिम हिमालयीन भागात 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Weather Update: Chance of rain in North Maharashtra and Marathwada, temperature will also rise)

हेही वाचा… Mumbai News : आला उन्हाळा मुंबईकरांनो तब्येत सांभाळा; महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज

- Advertisement -

भारतीय हवमाना खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रावर ढग दाटून आले आहेत. यामुळे पुढील 24 तासात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय, दिल्लीतही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. त्यामुळे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

देशाच्या विविध भागात आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील भागात ताशी 40-60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीचा अंदाज पाहता, राजधानी दिल्लीत पुढील 24 तासांत गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 31 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्य भारताच्या लगतच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस आणि काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान ईशान्य भारतात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एकीकडे देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत असताना दुसरीकडे देशाच्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असताना मुंबईसह पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात तापमानात वाढ दिसून येईल. शिवाय, एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताच्या रुग्णांचीही नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -