घरदेश-विदेशElectoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा..., रोहित पवारांनी...

Electoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा…, रोहित पवारांनी मतदारांना केले अलर्ट

Subscribe

मुंबई : इलेक्टोरल बॉण्ड स्कीम असंवैधानिक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही योजना बंद करण्याचा आदेश दिले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. अशातच प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पी. प्रभाकर याचे ‘इलेक्टोरोल बॉण्ड’संबंधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तोच व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (एनसीपी-एसपी) आमदार रोहित पवार यांनी मतदारांना सावध केले आहे.

हेही वाचा – Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका

- Advertisement -

इलेक्टोरल बॉण्ड स्कीम अर्थात निवडणूक रोख्यांची योजना ही अवैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ही योजना बंद करण्याचा आदेश 15 फेब्रुवारीला दिले होते. निवडणूक रोख्यांबाबत सामान्य नागरिकांना माहिती व्हायला हवी. राजकीय पक्षांकडे पैसा कुठून येतो हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले होते. त्यानुसार भारतीय स्टेट बँकेला (SBI) 2019पासूनची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करत एसबीआयने हा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला.

- Advertisement -

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पी. प्रभाकर याचे ‘इलेक्टोरोल बॉण्ड’बाबतचे वक्तव्य समोर आले आहे. इलेक्टोरल बाँण्ड्सचा मुद्दा खूप महत्त्वाचा मुद्दा बनणार आहे, असे मला वाटते. त्यामुळे भाजपाची लढत विरोधी पक्षांशी किंवा इतर कोणत्याही पक्षांशी नसून, या मुद्द्यावर खरी लढत भाजपा आणि भारतातील जनता यांच्यात होणार आहे, असे मत त्यांनी नोंदवले आहे.

हेही वाचा – Sunita Kejriwal : सुनीता केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा? ठोस भूमिका घेत भाजपावर करतायत टीका

एनसीपी-एसपीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थतज्ज्ञ पी. प्रभाकर यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचे मत हे या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे दर्शवते. इलेक्टोरोल बॉन्ड हा देशातीलच नाही तर जगातला सर्वांत मोठा घोटाळा असून यामुळे ‘भारतीय जनता पार्टी’ विरुद्ध ‘भारतीय जनता’ अशी लढाई सुरू झाल्याचे त्यांचे मत आहे. म्हणजे ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’पासून सुरू झाल्यानंतर ‘जगात सगळ्यात जास्त खाऊंगा’पर्यंत येऊन पोचलेला प्रवास आहे. मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा पुढच्या पाच वर्षांत ‘जागतिक विक्रम’ करणारे असे अनेक घोटाळे केवळ मूकपणे बघत बसावे लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Ram Naik VS Govinda : अभिनेता गोविंदावर केलेल्या आरोपावर आपण ठाम – राम नाईक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -