घरक्रीडाIPL 2024: RR vs DC सामन्यात ऋषभ पंतचा संयम सुटला, रागात भिंतीवर...

IPL 2024: RR vs DC सामन्यात ऋषभ पंतचा संयम सुटला, रागात भिंतीवर आदळली बॅट; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नवी दिल्ली: आयपीएल 2024 सध्या सुरू आहे. 15 महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन ऋषभ पंत याने पुनरागमन केलं आहे. परंतु तो सध्या त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. या लीगमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने सुरुवात तर चांगली केली, पण त्याला त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला होता, तर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 26 चेंडूत 28 धावा केल्या होत्या. मोठी धावसंख्या न बनवण्याची निराशा आता ऋषभ पंतच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर पंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो रागाने भिंतीवर बॅट आपटताना दिसत आहे. (IPL 2024 Rishabh Pant loses his temper in RR vs DC match bat hits wall in anger The video went viral)

RR विरुद्धच्या सामन्यात, पंत त्याच्या क्रमांक 4 वर फलंदाजीला आला होता, पण त्याच्या फलंदाजीमुळे संघाने मिचेल मार्श आणि रिकी भुई यांच्या सलग दोन विकेट गमावल्या होत्या. पंत येताच त्याच्या नजरा डेव्हिड वॉर्नरसह डाव सांभाळण्यावर खिळल्या होत्या. पंतने हे काम चोख बजावले, पण जेव्हा स्वत:च्या डावाला गती देण्याची संधी आली तेव्हा त्याने आपली विकेट गमावली.

- Advertisement -

ऋषभ पंतने 28 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावले. पंत आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने मैदानाबाहेर जाऊन बॅट भिंतीवर आदळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

आरआर विरुद्ध डीसी सामना कसा होता?

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही, संघाने 36 धावांवर यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन आणि जोस बटलरच्या रूपाने तीन मोठ्या विकेट्स गमावल्या. यानंतर रियान परागने आर अश्विनच्या साथीने डावाची धुरा सांभाळली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 54 धावांची भागीदारी झाली. रियान पराग शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्या 45 चेंडूत 84 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर यजमान संघाला 185 धावांपर्यंत मजल मारता आली.

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची चांगली सुरुवात झाली, मात्र कमकुवत झालेल्या मधल्या फळीमुळे संघाला लक्ष्य वेळेत गाठता आले नाही. डेव्हिड वॉर्नरने संघाकडून सर्वाधिक 49 धावांची खेळी खेळली. तर ट्रिस्टन स्टब्सने 44 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. दिल्ली संघाला निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून केवळ 173 धावा करता आल्या आणि त्यांना 12 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

(हेही वाचा: Loksabha 2024: संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; कारण आलं समोर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -