घरक्रीडाIPL 2024 : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा पराभव पण, चर्चा धोनीच्या ट्वीटची

IPL 2024 : दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा पराभव पण, चर्चा धोनीच्या ट्वीटची

Subscribe

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात कॅपिटल्सने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या या 13 व्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तुफान फलंदाजी केली. पण धावसंख्या आणि चेंडू कमी असल्याने हा सामना चेन्नईला गमवावा लागला. पण या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीचं चाहत्यांनी खूप कौतूक केले.

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात कॅपिटल्सने चेन्नईचा 20 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या या 13 व्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तुफान फलंदाजी केली. पण धावसंख्या आणि चेंडू कमी असल्याने हा सामना चेन्नईला गमवावा लागला. पण या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीचं चाहत्यांनी खूप कौतूक केले. विशेष म्हणजे या सामन्यानंतर धोनीचे 10 वर्ष जुने ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या ट्वीटची सध्या क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. (IPL 2024 ms dhoni 10 year old tweet viral csk vs dc)

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्य सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 191 धावांचे लक्ष्य ठेवले. त्याला प्रत्युत्तरात चेन्नईला 6 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. या पर्वातील चेन्नईचा हा पहिला पराभव आहे तर, दिल्लीला पहिला विजय मिळाला आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी दमदार फॉर्ममध्ये दिसला. आठव्या क्रमांकावर उतरून धोनीने चाहत्यांचे मनोरंजन केले. या अनुभवी फलंदाजाने अवघ्या 16 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावांची तुफानी खेळी केली. या सामन्यात 231.25 च्या स्ट्राइक रेटने धोनीने फलंदाजी केली.

- Advertisement -

या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला असला तरी, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट दिसत होती. याचे सर्वात कारण धोनी होते. अशात धोनीचे 10 वर्ष जुने ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये “कोणता संघ जिंकला याने काही फरक पडत नाही, मी येथे मजा करायला आलो आहे”, असे लिहिण्यात आले आहे. धोनीने हे ट्विट 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर केले होते.

दिल्लीविरुद्ध 16 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी करताना धोनीनेही एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा धोनी तिसरा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले. ज्याच्या नावावर 6962 धावा आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – MS Dhoni Record T-20: महेंद्रसिंह धोनीने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा पहिला यष्टीरक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -