घरक्रीडाMI VS DC : मुंबई इंडियन्ससमोर कामगिरी उंचावण्याचे ध्येय; आज दिल्ली कॅपिटल्सशी...

MI VS DC : मुंबई इंडियन्ससमोर कामगिरी उंचावण्याचे ध्येय; आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना

Subscribe

खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज आत्मविश्वासाने भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आपले आव्हान कायम राखण्यासाठी कामगिरी उंचवावी लागणार आहे.

नवी दिल्ली : खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना आज आत्मविश्वासाने भरलेल्या दिल्ली कॅपिटल्स होणार आहे. हे दोन्ही संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 43 व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ मागील चारपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे 8 पैकी फक्त 3 सामने जिंकून मुंबई इंडियन्स संघ पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात आपले आव्हान कायम राखण्यासाठी कामगिरी उंचवावी लागणार आहे. नाहीतर त्यांचा पुढील प्रवास कठीण होणार आहे. (IPL 2024 Today Match MI VS DC live Score Arun Jaitley Stadium Delhi in marathi)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची सुरुवात यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली झाली नाही. सुरुवातीचे सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईने पुढील सामने जिंकले. मात्र त्यानंतर पुढील तीन सामन्यात मुंबईला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. परंतु मुंबईचे अजूनही सहा सामने शिल्लक असल्याने त्यांना ‘प्ले-ऑफ’ गाठण्याची संधी कायम आहे. मात्र, त्यासाठी मुंबईला आपल्या कामगिरीत सातत्य राखणे अत्यंत गरजेचे झाले. मुंबईला गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून नऊ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्ससमोर कसे प्रदर्शन करते हे पाहावे लागेल.

- Advertisement -

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 34 सामने झाले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सने 19 आणि दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने या हंगामातील पहिला विजय दिल्लीविरुद्ध नोंदवला होता. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सचा पराभवा करत आपले आव्हान कायम राखण्याची संधी आहे. त्यामुळे आता दिल्ली कॅपिट्लसविरुद्ध सामना जिंकायचा असेल तर खेळाडूंना आत्मविश्वास देण्याचे काम कर्णधार हार्दिकला करावे लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान आजच्या सामन्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांने सांगितले की, दिल्लीचे मैदान लहान आहे आणि लहान मैदानावर दुसरी फलंदाजी करणे खूप चांगले ठरेल. प्रत्येक खेळ हा नवा असतो. त्यामुळे आम्ही लढत राहतो आणि प्रत्येक गेममध्ये पुढे जात राहतो. भूतकाळात काय घडले आहे यावर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. कोणीही कोणालाही हरवू शकतो. आमचा ब्रँड क्रिकेट खेळणे आणि आमचे सर्वोत्तम पाऊल पुढे टाकणे, हे आमचे ध्येय आहे. तसेच संघात फक्त एक बदल केला असल्याचेही त्याने सांगितले.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितले की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. कारण मला वाटतं की दुसऱ्या डावात धावांचा वेग कमी होईल. एक संघ म्हणून आम्हाला चांगले खेळायचे आहे. नवीन चेंडूने गोलंदाजी करणे आणि डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणे कठीण आहे. तसेच संघात फक्त एक बदल केला असल्याचेही ऋषभ पंतने सांगितले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, पियुष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -