घरक्रीडाइरफान पठाण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

इरफान पठाण आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Subscribe

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात इरफान पठाणने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. इरफानने आतापर्यंत 120 वन-डे, 29 कसोटी आणि 24 टी-20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

तब्बल 15 वर्षे इरफान भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत होता.आपल्या झुंजार स्वभावाला साजेशी कामगिरी करत इरफानने दमदार पुनरागमन करत आपले संघातील स्थान कायम राखले. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयात पठाणचाही मोलाचा वाटा होता.

- Advertisement -

पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात घेतलेल्या हॅटट्रीकमुळे इरफान पठाण पहिल्यांदा चर्चेत आला. आपल्या नैसर्गिक शैलीमुळे पठाणने फार कमी कालावधीत टीम इंडियात आपले स्थान पक्के केले होते. चेंडू स्विंग करणे ही त्याची खासियत होती. आपल्या कौशल्यामुळे इरफानने दिग्गज फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.मात्र काही कालावधीनंतर त्याच्या कामगिरीत घसरण पहायला मिळाली.

29 कसोटी – 100 बळी (सर्वोत्तम कामगिरी – 7/59)
120 वन-डे – 173 बळी (सर्वोत्तम कामगिरी – 5/27)
24 टी-20 – 28 बळी (सर्वोत्तम कामगिरी – 3/16)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -