घरक्रीडाIPL 2022 : क्षेत्ररक्षणातील बाप माणूस जेव्हा क्रिकेटच्या देवाच्या पाया पडतो...

IPL 2022 : क्षेत्ररक्षणातील बाप माणूस जेव्हा क्रिकेटच्या देवाच्या पाया पडतो…

Subscribe

क्रिकेटमधील मोलाच्या योगदानामुळं भारताचा माजी फलंदाजी सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं. भारतासह जगभरातील अनेक क्रिकेटपटूंचा सचिन हा आदर्श आहे. सचिन तेंडुलकर हा 2013 साली निवृत्त झाला. पण त्याची क्रेझ अद्याप कायम आहे.

क्रिकेटमधील मोलाच्या योगदानामुळं भारताचा माजी फलंदाजी सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं. भारतासह जगभरातील अनेक क्रिकेटपटूंचा सचिन हा आदर्श आहे. सचिन तेंडुलकर हा 2013 साली निवृत्त झाला. पण त्याची क्रेझ अद्याप कायम आहे. सचिनच्या या कामगिरीमुळे अनेकजण त्याला भेटल्यावर प्रथम त्याचा आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामन्यानंतर पाहायला मिळाली.

क्षेत्ररक्षणातील बाप माणूस म्हणून ओळखला जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सनं सचिन तेंडुलकरच्या आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या खेळाडूंना भेटण्यासाठी मेंटॉर सचिन तेंडुलकर मैदानावर अवतरला होता. त्यावेळी आयपीएलमधील पंजाब किंग्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स सचिन तेंडुलकरच्या पाया पडत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाबबरोबर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या 15 व्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुंबईला पहिल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.

पण आयपीएल प्लेऑफच्या स्पर्धेतून अद्याप बाहेर गेलेला नाही. मुंबईला आणखीही संधी आहे. याआधीही मुंबईने पुनरागमन करण्याचा करिश्मा केला आहे. आयआधी मुंबईने लागोपाठ पाच पराभवानंतर प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: मुंबईचा सलग पाचवा पराभव; कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -