घरमहाराष्ट्रनाशिककसारा घाटात विचित्र अपघात

कसारा घाटात विचित्र अपघात

Subscribe

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक फेल पॉइंट जवळ एका आयशर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशरने पुढे जाणाऱ्या कार व ट्रकला जोरदार धडक दिली….

धडक दिल्यानंतर आयशर पलटी झाला असुन या अपघातात एक जण गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यावर काही वेळाने याच ठिकाणी उतार उतरत असताना स्पीडब्रेकर वर एक कंटेनरने सलग चार वाहनांना धडक दिली.

- Advertisement -

यात सहा महिला किरकोळ जखमी झाल्या असून महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे व पोलीस पथक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी झालेल्या नागरिकांना नरेंद्र महाराज रुग्ण संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -