घरक्रीडाBadminton : विश्वचॅम्पियनशिपमध्ये खेळणार किदांबी श्रीकांत; आयोजकांच्या दबावामुळे व्हिसा मंजूर

Badminton : विश्वचॅम्पियनशिपमध्ये खेळणार किदांबी श्रीकांत; आयोजकांच्या दबावामुळे व्हिसा मंजूर

Subscribe

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा स्पेनमध्ये सुरू होत असलेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतचा स्पेनमध्ये सुरू होत असलेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दरम्यान आयोजकांच्या दबावामुळे अंतिम क्षणी स्पॅनिशच्या दूतावासाने त्याला व्हिसा मंजूर केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे श्रीकांत स्पेनला पोहचला देखील आहे आणि तिथे त्याची आरटीपीसीआरची चाचणी देखील निगेटिव्ह आली आहे. जागतिक पातळीवर १४ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतकडे स्पेनचा व्हिसा नव्हता. इंडोनेशियामध्ये विश्व टूर फायनल्सची स्पर्धा संपल्यानंतर पी.व्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक साईराज रंक्कीरेड्डी, चिराग शेट्टी यांसारखे बॅडमिंटनपटू तिथून स्पेनसाठी रवाना झाले आहेत.

मात्र, श्रीकांतला व्हिसा मिळवण्यासाठी भारतात परतावे लागले. पण चॅम्पियनशिप सुरू होण्याच्या चार दिवस अगोदरपर्यंत त्याला व्हिसा दिला नव्हता.

- Advertisement -

आयोजकांनी यानंतर दूतावासावर खूप दबाव निर्माण केला तेव्हा त्याला व्हिसा मिळाला. व्हिसा मिळाल्यानंतर तीन तासांच्या आतच श्रीकांतला स्पेनसाठी रवाना करण्यात आले. मात्र, त्याचे फिजिओ शिवलन्का आणि इंडोनेशियातील प्रशिक्षक द्वी क्रिस्त्यवान हे स्पेनला जाऊ शकले नाहीत. द्वी क्रिस्त्यवान यांच्या जागेवर डबल्स प्रशिक्षक विष्णु यांना पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, स्टार भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये शानदार विजयासोबत सुरूवात केली होती. रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतने स्पेनच्या पाब्लो एबीएनला ३६ मिनिटांत २१-१२, २१-१६ असा पराभव केला होता.

- Advertisement -

हे ही वाचा : http://Ashes Series 2021 : मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी अँडरसन, ब्रॉड फिट; कोच सिल्व्हरवुड यांची माहिती


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -