घरक्रीडामहापौर चषक खो-खो

महापौर चषक खो-खो

Subscribe

नवमहाराष्ट्र, रा.फ.नाईकला जेतेपद

नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोपरखैरणे येथे झालेल्या नवी मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या पुरुष गटात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने, तर महिला गटात नवी मुंबईच्या रा.फ.नाईक विद्यालय, कोपरखैरणे यांनी जेतेपद पटकावले. या स्पर्धेत पुरुषांचे आणि महिलांचे प्रत्येकी ८ संघ सहभागी झाले होते.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने मुंबई उपनगराच्या महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीला पराभूत केले. तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे विहंग क्रीडा मंडळ, ठाणे आणि ग्रिफीन जिमखाना, ठाणे यांनी मिळवला. महिलांच्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालयाने रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला.

- Advertisement -

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूचा पुरस्कार पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्रच्या सुयश गरगटेला, तर महिलांमध्ये रा.फ.नाईक विद्यालयाच्या पौर्णिमा सकपाळला मिळाला. सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून पुरुषांमध्ये नवमहाराष्ट्रच्या प्रतिक वाईकर आणि महिलांमध्ये रा.फ.नाईक विद्यालयाच्या रूपाली बडेला गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमणातील खेळाडू म्हणून महात्मा गांधी स्पोर्ट्स केडमीच्या नितेश रूकेची आणि महिलांमध्ये आर्यन स्पोर्ट्स क्लबच्या अपेक्षा सुतारची निवड झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -