घरक्रीडामॅक्डोनाल्ड राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी!

मॅक्डोनाल्ड राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी!

Subscribe

आयपीएल स्पर्धा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू मॅक्डोनाल्डची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. राजस्थानने मॅक्डोनाल्डशी तीन वर्षांचा करार केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून चार कसोटी सामने खेळणार्‍या मॅक्डोनाल्डने २००९ सालच्या आयपीएल मोसमात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर २०१२-१३ मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला होता. त्याने बंगळुरूचेच गोलंदाजी प्रशिक्षकपदही भूषवले होते.

तसेच ३८ वर्षीय मॅक्डोनाल्डने कौंटी क्रिकेटमध्ये लेस्टरशायर, ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेटमध्ये व्हिक्टोरिया आणि बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्स या संघांनाही प्रशिक्षण दिले आहे. त्याच्या मार्गदर्शनात व्हिक्टोरियाने शेफिल्ड शिल्ड, तर मागील मोसमात मेलबर्न रेनेगेड्स संघाने बिग बॅशचे जेतेपद पटकावले.

- Advertisement -

अँड्र्यूची प्रशिक्षकपदी निवड करताना आम्हाला आनंद होत आहे, असे राजस्थान रॉयल्सने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले. राजस्थान रॉयल्सने २००८ साली झालेल्या आयपीएलच्या पहिल्या मोसमाचे जेतेपद मिळवले होते. मात्र, त्यानंतर त्यांना ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -