घरक्रीडालिव्हरपूलची विजयांची मालिका संपुष्टात; मँचेस्टर युनायटेडविरुद्ध बरोबरी

लिव्हरपूलची विजयांची मालिका संपुष्टात; मँचेस्टर युनायटेडविरुद्ध बरोबरी

Subscribe

इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा

लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड या दोन प्रसिद्ध इंग्लिश संघांमधील प्रीमियर लीगचा सामना १-१ असा बरोबरीत संपला. हा सामना बरोबरीत राहिल्याने लिव्हरपूलची विजयांची मालिका संपुष्टात आली आहे. लिव्हरपूलने प्रीमियर लीगमध्ये या सामन्याआधी सलग १७ सामने जिंकले होते. तसेच त्यांनी या मोसमात ८ पैकी ८ सामने जिंकले होते. मात्र, स्टार खेळाडू मोहम्मद सलाहच्या अनुपस्थितीत लिव्हरपूलला हा सामना जिंकण्यात अपयश आले. परंतु, त्यांनी गुणतक्त्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांना चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे पहिल्या अर्ध्या तासात दोन्ही संघांना गोल करण्याची संधी मिळाली नाही. या सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला लिव्हरपूलच्या फार्मिन्होने गोलवर मारलेला फटका मँचेस्टर युनायटेडचा गोलरक्षक डेविड ड गेयाने अडवला. मात्र, दोन मिनिटांनंतरच मँचेस्टर युनायटेडला गोल करण्याची संधी मिळाली. डेविड जेम्सच्या पासवर स्ट्रायकर मार्कस रॅशफोर्डने या संधीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि मँचेस्टर युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यांना ही आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखण्यात यश आले.

- Advertisement -

मध्यंतरानंतर लिव्हरपूलचा संघ आपल्या खेळात सुधारणा करेल असे अपेक्षित होते, पण सुरुवातीला त्यांना चांगला खेळ करता आला नाही. मात्र, मँचेस्टर युनायटेड अधिक सावधपणे खेळण्यास सुरुवात केली. याचा फायदा लिव्हरपूलला मिळू लागला. अखेर ८५ व्या मिनिटाला आंद्रे रॉबर्टसनच्या क्रॉसवर अ‍ॅडम ललानाने गोल करत लिव्हरपूलला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत संपला. यंदाच्या मोसमात मँचेस्टर युनायटेडला ९ पैकी केवळ २ सामने जिंकता आले असून बरोबरीत राहिलेला हा त्यांचा चौथा सामना होता, तर त्यांनी ३ सामने गमावले आहेत.

अव्वल स्थानी कायम

- Advertisement -

मँचेस्टर युनायटेडविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला असला तरी लिव्हरपूलने प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. यंदाच्या मोसमात ९ पैकी ८ सामने जिंकण्यात यश आलेल्या लिव्हरपूलचे २५ गुण आहेत. दुसर्‍या स्थानावर असलेल्या गतविजेत्या मँचेस्टर सिटीच्या खात्यात १९ गुण आहेत. तसेच तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर असणार्‍या लेस्टर सिटी आणि चेल्सीचे १७-१७ गुण आहेत. तर ९ सामन्यांनंतर केवळ १० गुण असलेला मँचेस्टर युनायटेडचा संघ १३ व्या स्थानी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -