घरक्रीडाIPL 2022: तुम्ही मला पिवळ्या जर्सीत बघाल पण..,आगामी वर्षात आयपीएल खेळण्याबाबत धोनीचं...

IPL 2022: तुम्ही मला पिवळ्या जर्सीत बघाल पण..,आगामी वर्षात आयपीएल खेळण्याबाबत धोनीचं मोठं वक्तव्य

Subscribe

चेन्नई सुपर किंग्जचा फिनिशर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. काल रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. सर्वात प्रथम दोन्ही संघामध्ये नाणेफेक झाली. यामध्ये हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकली आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सूत्रसंचालक डॅनी मॉरिसनने धोनीला प्रश्न विचारला की, यापुढेही तू पिवळ्या जर्सीत खेळताना दिसणार का? यावर चेन्नईच्या कर्णधाराने हसत उत्तर दिले. तो म्हणाला, होय नक्कीच, तुम्ही मला पिवळ्या जर्सीत पहाल, पण हीच जर्सी असेल की दुसरी कोणती, याबद्दल मला खात्री नाही, असं धोनी म्हणाला.

- Advertisement -

नाणेफेकीदरम्यान धोनीने आयपीएलमधील आपल्या भविष्याबाबत मोठी चर्चा केली. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने १२१ सामने जिंकले आहेत. यावेळी त्याला चेन्नई सुपर किंग्सने १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. याशिवाय चेन्नईने अन्य तीन खेळाडूंनाही कायम ठेवले होते.

- Advertisement -

ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला सर्वाधिक १६ कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यात आले आहे. जडेजाला सर्वाधिक किंमत दिल्यानंतर तो भविष्यात कर्णधार कायम राहील अशा प्रकारची चर्चा होती आणि तसेच झाले.

महेंद्रसिंग धोनीने १५ वा हंगाम सुरू होण्यापूर्वीच्या दोन दिवस आधी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले, मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. त्याच्या नेतृत्वाखाली संघ आठपैकी सहा सामने हरला. खुद्द जडेजाचीही खराब कामगिरी होती. यामुळे त्याने कर्णधारपद सोडले आणि शनिवारी ३० एप्रिल रोजी धोनी पुन्हा संघाचा कर्णधार झाला.


हेही वाचा : कुणाचीही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -