घरक्रीडाMS Dhoniचे नव्या क्षेत्रात पदार्पण ; ग्राफिक नॉवेल 'अथर्व' चा फर्स्ट लूक...

MS Dhoniचे नव्या क्षेत्रात पदार्पण ; ग्राफिक नॉवेल ‘अथर्व’ चा फर्स्ट लूक रिलीज

Subscribe

क्रिकेटच्या मैदानावर बाजी मारणारा एम. एस. धोनी आता एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. एम.एस. धोनी ग्राफीक नॉवेलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याने या नॉवेलचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. धोनीनं स्वत: याबाबत सांगितलं आहे. भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ग्राफीक कादंबरी अथर्वमध्ये दिसणार आहे.

क्रिकेटच्या मैदानावर बाजी मारणारा एम. एस. धोनी आता एका नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. एम.एस. धोनी ग्राफीक नॉवेलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याने या नॉवेलचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. धोनीनं स्वत: याबाबत सांगितलं आहे. भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ग्राफीक कादंबरी अथर्वमध्ये दिसणार आहे. अथर्वचा फर्स्ट लूक व्हिडिओ बुधवारी एका व्हिडिओ क्लिपद्वारे रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये धोनी अॅनिमेटेड अवतारात दिसत आहे. या ग्राफीक कादंबरीचे शीर्षक अथर्व- द ओरिजिन आहे. ‘अथर्व- द ओरिजिन’ ही एक आकर्षक नॉवेल आहे. या सिरीजमध्ये धोनी एखाद्या शूर वीराप्रमाणे राक्षसांचा सामना करताना दिसणार आहे. या टिझरमध्येच धोनीचा रौद्र रुपाची झलक पाहायला मिळतेय.

रमेश थमिलमनी यांनी ही नॉवेल लिहली असून. ज्याला धोनी एन्टरटेन्मेंट सपोर्ट आहे. क्रिकेटच्या मैदनावार आपल्या जबरदस्त खेळीने सर्वांवर प्रभाव पाडणारा भारतीय क्रिकेटर एम.एस दोनी आता नव्या अंदाजात सर्वांसमोर येत आहे. सध्या धोनीच्या या लूकची जोरदार चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

अर्थव द ओरिजीनचा एक टिजर शेअर केल्यानंतर धोनीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मिळालेल्या, माहितीनुसार,कादंबरी एका पौराणिक कथेवर आधारित आहे जी विज्ञानाशीही जोडलेली आहे. दरम्यान, धोनीने त्याच्या या नव्या इनिंगबद्दल माहीती दिली आहे. या नव्या संकल्पनेशी जोडला गेल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. काही तरी नवीन घेऊन येण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे एम.एस. धोनीने म्हटले आहे.

ही एक आकर्षक नॉवेल

‘अथर्व: द ओरिजन’ या ग्राफीक नॉवेलची निर्मिती Virzu Studios आणि MIDAS Deals प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे. या नॉवेलबद्दल धोनीने सांगितलं, ‘मी या प्रोजेक्टसाठी एक्सायडेट आहे.’अथर्व- द ओरिजिन’ ही एक आकर्षक नॉवेल आहे. यामध्ये आर्टवर्क केलं गेलं आहे. लेखक रमेश थमिलमनी यांनी भारताची पहिली सुपरहिरो नॉवेल ही कंटेप्टरेरी ट्विस्टसह लाँच करण्याचे ठरवले आहे.’ गेली काही वर्ष या नॉवेलच्या निर्मितीचे काम सुरू होते. आता या नॉवेलचा फर्स्ट लूक पाहून धोनीचे चाहते ही नॉवेल रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

यंदादेखील धोनी बाजी मारणार

नुकतचं आयपीएल 2022 च्या मेगा लिलावासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. दरम्यान 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा लिलावासाठी एखणून 590 खेळाडूंना यादीत स्थान मिळालं आहे. यंदा देखील धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार असून, गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील धोनी बाजी मारणार हे पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. मात्र,सध्या त्याचा नॉवेलमधील फर्स्ट लूव सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


हे ही वाचा – आरोपी बचावासाठी अनेकांची नावे घेत असतो, परमबीर सिंहांच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -