घरक्रीडाएका धावेने नेपाळने नोंदवला आपला पहिला एकदिवसीय विजय!

एका धावेने नेपाळने नोंदवला आपला पहिला एकदिवसीय विजय!

Subscribe

नेदरलँडमध्ये पार पडलेल्या नेपाळ आणि नेदरलँड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात नेपाळने अवघ्या एका धावेने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा पहिलाच एकदिवसीय सामन्यातील विजय आहे.

नेपाळ क्रिकेट टीमच्या नेदरलँड दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नेपाळने अवघ्या एका धावेने विजय मिळवत आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आपला पहिला विजय नोंदवला आहे. याआधीचा दौऱ्यातील पहिला सामना नेदरलँडने ५५ धावांनी जिंकला होता. मात्र दुसरा सामना जिंकत नेपाळने मालिकेत बरोबरी साधली आहे.

- Advertisement -

असा झाला सामना

शुक्रवारी झालेल्या सामन्यात नेपाळने टॉस जिंकत पहिली बॅटिंग घेतली. नेपाळकडून बॅटिंग करताना कर्णधार पारस खडका आणि सोमपाल कमी या दोघांनी अप्रतिम अर्धशतकी खेळी केली. ज्यात पारसने ५१ तर सोमपालने ६१ धावा केल्या. या दोन अर्धशतकांच्या जोरावर नेपाळने २१६ धावा करत नेदरलँडसमोर २१७ धावांचे लक्ष ठेवले. नेदरलँडकडून फ्रेडने ३ तर मायकल आणि पीटर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर शेन याने एक विकेट आपल्या नावे केली.

Paras-Khadka
पारस खडका

यानंतर नेदरलँडकडून बॅटिंग करताना वेस्ली याने सर्वाधिक ७१ धाव केल्या. मात्र दुसरा कोणताही बॅट्समन काही खास कामगिरी करू शकला नाही आणि अगदी शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कर्णधार पारसने अप्रतिम फिल्डींग करून नेदलँडचा शेवटचा बॅट्समन फ्रेडला रनआउट करत सामन्यात एका धावाने विजय मिळवला. नेपाळकडून आयपीएलमध्ये अप्रतिम बॉलिंग करणाऱ्या संदीपने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ललितने २ आणि पारस, बसंत, दिपेंद्र आणि सोमपालने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

- Advertisement -

सोमपाल ठरला ‘मॅन ऑफ दी मॅच’

नेपाळकडून ऑलराउंडर खेळी करणाऱ्या सोमपालला मॅन ऑफ दी मॅच म्हणून घोषित करण्यात आले. सोमपालने बॅटिंग करताना अप्रतिम ६१ धावा केल्या. अवघ्या ४६ बॉलमध्ये ५ फोर आणि ३ सिक्स ठोकत सोमपालने ६१ धावा केल्या तर बॉलिंग करताना एक विकेट देखील आपल्या नावे केली.

sompal kami
सोमपाल कमी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -