घरदेश-विदेशगोव्यात कुत्रे-मांजरे कचऱ्यात

गोव्यात कुत्रे-मांजरे कचऱ्यात

Subscribe

३५ कुत्र्यांची आणि २५ मांजरीचे पिल्लांची कचऱ्यातून सुटका करण्यात आली.

कचरा म्हटलं की वापरण्यात न येणाऱ्या वस्तू अशी साधारण संकल्पना आहे. गोव्यात कुत्र्या आणि माजंराजी संख्या इतकी वाढली आहे की नागरिक आता त्यांच्या पिल्लांना कचऱ्यात फेकून देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विधानसभेत बोलताना ही माहिती दिली. गोव्यातील डम्पींग ग्राऊंडमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करते वेळी आतापर्यंत ३५ कुत्र्यांची आणि २५ माजरींची पिल्ले सापडली. यांची सुटका करुन त्यांचा साभाळ केला जात आहे. या डम्पींग ग्राऊंडचा प्लान्ट उत्तर गोवा येथील सलगाई गावाजळील परिसरात आहे. कर्नाटकातील सिमेंट कारखान्यांकडून गोळा केलेला कचरा जमा करण्यावरून भाजप आमदरा निलेश काब्राल यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

“आपण पसरवलेला कचरा हा निसर्गात मिसळतो आहे. कचऱ्यामध्ये आम्हाला जिंवत कुत्र्यांची आणि मांजरांची पिल्ले सापडली. आतापर्यंत २०-२५ मांजरांचे आणि ३०-३५ कुत्र्यांची जिवंत पिल्ले सापडली आहेत. यांची सुटका करण्यात करुन त्यांचा सांभाळ करणे गरजेचे आहे. कारखाने किंवा इतर ठिकाणाहून आलेला कचरा हा मुख्य कचऱ्यात मिसळत आहे. यामध्ये प्लास्टिकचा ही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. हा कचरा जाळून नष्ट करण्याची गरज असल्यामुळे कचरा सिमेंट कंपन्यांमध्ये पाठण्यात येतोय.”- मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर

- Advertisement -

कचरा व्यवस्थापन संयंत्रात अकार्बिक कचरा प्रामुख्याने प्लास्टिक आणि कापड आहे. या कचऱ्यातून ओला व सुखा कचरा वेगळा करुन याचा वापर सिमेंट कारखान्यांना इंधन म्हणून होऊ शकतो. कर्नाटकातील चार सिमेंट कंपन्या गोव्यातील डम्पींग ग्राऊंडमधून कचरा गोळा करतात. महादैय पाणी विवादानंतर गोवा सरकारने अन्य राज्यातील पर्यायी सिमेंटच्या प्लान्टचा विचार करावा असे कब्राल यांनी सांगितले. यावर उपाय म्हणून महाराष्ट्रातील काही कंपन्यांशी बोलणी केली असल्याचे पर्रिकरांनी उत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -