घरक्रीडाबीसीसीआय कर्मचाऱ्यांची पगारवाढ नाही 

बीसीसीआय कर्मचाऱ्यांची पगारवाढ नाही 

Subscribe

जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी संस्था म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने मागील वर्षात २५ हजार कोटी इतकी घसघशीत कमाई केली आहे. असे असतानाही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार मात्र वाढवलेले नाहीत. मात्र काही दिसांपूर्वीच निवड समिती सदस्यांच्या पगारात वाढ झाली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसते. यावेळी निमित्त ठरले आहे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे. बीसीसीआयने मागील वर्षात २५ हजार कोटी इतकी कमाई केली आहे. आयपीएल आणि अन्य आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात घसघशीत वाढ झाली आहे. असे असूनही बीसीसीआयने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवलेले नाहीत असे कळते. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने आपल्या वेबसाईटवर याबाबत वृत्त दिले आहे.

बीसीसीआय आणि कर्मचारी यांच्यात वाद 

बीसीसीआयच्या कार्यालयात सध्या जवळपास १०० कर्मचारी कार्यरत आहेत. बीसीसीआयच्या वानखेडे स्टेडियम येथे असलेल्या कार्यालयात हे कर्मचारी काम करतात. अंतर्गत भांडणामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वाढवलेले नाहीत, असे कारण समोर येत आहे. तसेच बीसीसीआय आणि कर्मचारी यांच्यात वाद असल्याचेही म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी निवड समिती सदस्यांच्या पगारात झाली होती वाढ 

काही दिवसांपूर्वीच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या पगारात २० लाखांनी वाढला होता. त्यामुळे त्यांचा वार्षिक पगार ८० लाखांहून थेट १ करोड इतका झाला आहे. तर निवड समितीच्या इतर सदस्यांचे पगार ३० लाखांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा पगार ९० लाख इतका झाला आहे. तर महिला संघाच्या निवड समिती सदस्यांचे पगारही वाढवण्यात आले होते. त्यांच्या अध्यक्षांचा पगार ३० लाख इतका करण्यात आला होता.

खेळाडूंचीही केली होती पगारवाढ 

काही महिन्यांपूर्वी भारतीय खेळाडूंच्याही पगारात वाढ झाली होती. यासाठी बीसीसीआयने नवीन अव्वल श्रेणीही करण्यात आली होती. या अव्वल श्रेणीत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांसारखे खेळाडू होते. ज्यांचा वार्षिक पगार ७ करोड इतका करण्यात आला होता. तर अ श्रेणीत धोनी, अश्विन यांसारख्या खेळाडूंचा समावेश होता. त्यांचा पगार ५ करोड इतका करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -