घरक्राइमऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात खुनाचा आरोप

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात खुनाचा आरोप

Subscribe

भारताला दोन ऑलिम्पिक पदंक देणारा कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात खुनाचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशीलकुमार आता दिल्ली पोलिसांचा रडारवर आहे. देशातील मोठ्या कुस्तीपटू सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारसह अन्य दोन कुस्तीपटूंच्या घरावर धाड टाकली आहे.

काय आहे प्रकरण ?

दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअममध्ये मंगळवारी रात्री दोन कुस्तीपटूंच्या गटात हाणामारी झाली. या हाणामारीत एका २३ वर्षीय ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीप विजेत्या कुस्तीपटूची हत्या झाली आहे. या हाणामारीत जीव गमावलेल्या कुस्तीपटूचं नाव सागर कुमार असं आहे आणि तो दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. या प्रकरणी सुशील कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

उत्तर पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. गुरिकबाल सिंग सिंधू यांच्या माहितीनुसार, ”सुशील कुमारविरोधातील आरोपांचा आम्ही तपास करत आहोत. दरम्यान चौकशीसाठी आमची एक टीमही सुशील कुमारच्या घरी पाठवली होती, परंतु तो घरी नव्हता. त्यामुळे आम्ही त्याचा शोध घेत आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक टीम तयार केल्या आहेत. दरम्यान सब इन्स्पेक्टर जितेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे माहिती समोर आली आहे. त्यानुसार सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांलविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या FIRमध्ये नोंद झालेल्या माहितीनुसार सुमारे चार तास ही हाणामारी सुरु होती,.

छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स, सोनू, सागर, अमित आणि अन्य कुस्तीपटूंमध्ये मारामारी झाली. सागर आणि त्याचे मित्र स्टेडियम जवळच्या टाऊन हॉलमधील एका घरात राहत होते. त्यांना नुकतंच हे घर रिकामं करण्याची सूचना देण्यात आली होती.या हाणामारीत सोनू महल (वय, 35) आणि अमित कुमार (वय 27) हे दोघं जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रिन्स दलाल (वय 24) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त केली आहे.

- Advertisement -

सुशील कुमारनं २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते, त्यानंतर २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यानं रौप्यपदकाची कमाई केली. २०१०च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकले. २०१०, २०१४ व २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्या नावावर सुवर्णपदकं आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -