घरक्रीडापाकिस्तानी खेळाडूंना कोहलीसारखे व्हायचेय! - युनिस खान

पाकिस्तानी खेळाडूंना कोहलीसारखे व्हायचेय! – युनिस खान

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे आणि फिटनेसचे अनेक चाहते आहेत. फक्त भारतातीलच नाही, तर जगभरातील क्रिकेटपटू त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. याला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानचे खेळाडूही अपवाद नाहीत. पाकिस्तानच्या खेळाडूंना कोहलीसारखे व्हायचे आहे, असे विधान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू युनिस खानने केले आहे.

विराट कोहलीचे पाकिस्तानमध्येही खूप चाहते आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचे बरेच खेळाडू त्याचे अनुकरण करतात. त्यांना कोहलीसारखे खेळायचे आणि फिट व्हायचे आहे. आशिया चषकात कोहली नसतानाही स्टेडियम पूर्ण भरले होते. मात्र, विराट संघात असल्याचा भारतीय संघाला खूप फायदा होईल. विश्वचषकात भारतासाठी कोहली खूप महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे पाकिस्तानसाठी ११८ कसोटी सामने खेळणारा युनिस म्हणाला.

- Advertisement -

मी त्याचा चाहता – रिचर्ड्स

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हीव रिचर्ड्स हे विराट कोहलीचे चाहते आहेत. कोहलीविषयी ते म्हणाले, मला कोहलीसारखे खेळाडू आवडतात. काही लोकांना तो अहंकारी वाटतो, मात्र ही त्यांची गैरसमजूत आहे. तो अहंकारी नाही, तर त्याला कोणाही विरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे. मला भारताचे फलंदाज पूर्वीपासूनच आवडतात. त्याच्यात जितका आत्मविश्वास आहे, तो दुसरा व्यक्ती तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही तो घेऊनच जन्माला येत. तो झुंजार खेळाडू आहे आणि तो नेहमी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभा राहतो ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -