घरक्रीडाविलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी पुनःश्च सज्ज

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी पुनःश्च सज्ज

Subscribe

कोविड महामारी सारखे भयंकर संकट जगभरात हाहाकार माजवित असताना सर्व स्थरावर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. अशा वेळी केंद्र व राज्य आरोग्य मंत्रालयाच्या कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करीत विलेपार्ले पूर्व स्थित ISO मानांकित व नामांकित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल खेळासाठी पुनःश्च सज्ज झाले आहे.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सचिव डॉ. मोहन राणे यांनी दिलेल्या माहिती नुसार कोविड-१९ च्या काळात महामारीचा प्रभाव रोखण्यासाठी काही महिने संपूर्ण संकुल बंद ठेवण्यात आले होते. परंतु एवढे मोठे संकट आले तरी त्या संकुलाची काळजी व स्वच्छता मोहीम यशस्वी राबविण्यात आली. अनलॉक नंतर संकुल खेळाडूंच्या स्वागतासाठी पुन्हा चालू करण्यापूर्वी योग्य स्वच्छता पडताळणी व काटेकोर काळजी घेण्यात आली होती. संपूर्ण संकुलाचे निर्जंतुकीकरण करणे कीटकनाशके वापरून सर्व जागा स्वच्छ करणे, जागोजागी हँड सॅनिटाईझर बसवणे, टेम्परेचर गन तसेच पल्स ऑक्सिमिटरच्या सोयी करणे, कोविड-१९ पासून प्रबोधन करण्याच्या हेतूने संकुलामध्ये भित्तिचित्रे बसविण्यात आली आहेत. तसेच सर्व प्रशिक्षक व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व कोविड-१९ अँटिबॉडीज टेस्ट करण्यात आली आहे. वरील सर्व कामांवर अध्यक्ष अरविंद प्रभू विडिओ काँफेरेन्स द्वारे व सचिव डॉ. मोहन राणे व मुख्य अधिकारी प्रितम केसकर प्रत्यक्ष देखरेख करीत होते.

- Advertisement -

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात जिम, जिम्नॅस्टिकस, टेबल टेनिस, स्केटिंग, पिकल बॉल, एअर बॅडमिंटन, कराटे, जुडो, एअर रायफल शूटिंग, झुंबा, भरतनाट्यम, डान्स क्लासेस, योगा, नेट क्रिकेट, फुटबॉल याचबरोबर,
(स्विमिंग, डायविंग राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्थरावर खेळण्याऱ्या मुलांसाठी सुरु करण्यात आले आहे.) संकुलात मास्क चा वापर व सोशल डिस्टेनसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त सभासद नोंदणी करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आता येथे सुरू केली आहे. तसेच सदस्य शुल्क ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्विकारण्यात येत आहे. जेणेकरून सदस्य घरी बसून नोंदणी करून त्यांचा वेळ वाचवू शकतील.

स्वच्छ परिसर, निर्जंतुक स्वछतागृह, निर्जंतुक जिम व सर्व उपकरणे तसेच सदस्यांची काळजी घेण्यास संकुल पुनःश्च सज्ज आहे. सुरक्षा रक्षक व कार्यालयीन कर्मचारी वर्ग तसेच सर्व मॅनेजमेंट आपले स्वागत करीत आहे.
निरोगी वातावरणात खेळा आणि शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवा, असा संदेश प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू तसेच सचिव डॉ. मोहन राणे व मुख्य अधिकारी ॉ प्रितम केसकर यांनी सर्व सभासद खेळाडूंना दिला आहे.

- Advertisement -

अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. ७७००९६७४२२, ८८६६५२६४९७, ८१०४९७१०३७, ९६५३४७५७७८, ०२२२६८३७७६६

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -