घरक्रीडाप्रवीण आमरे फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

प्रवीण आमरे फलंदाजी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत

Subscribe

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सहाय्यक (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण) प्रशिक्षकांचा करार विश्वचषकानंतर संपुष्टात आला, पण आगामी विंडीज दौर्‍यासाठी बीसीसीआयने त्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. ३० जुलैपर्यंत बीसीसीआयने संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. भारत आणि मुंबईचे माजी खेळाडू प्रवीण आमरे हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्जदेखील केला आहे.

आमरे यांनी ११ कसोटी आणि ३७ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य असणार्‍या आमरे यांच्या मार्गदर्शनखाली मुंबईच्या संघाने रणजी करंडकाचे जेतेपद पटकावले होते. आमरे सध्या अमेरिकेच्या क्रिकेट संघाचे फलंदाजी सल्लागार म्हणून काम करत आहेत. आयपीएलमध्ये ते दिल्ली कॅपिटल्स संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, श्रेयस अय्यर यासारख्या खेळाडूंना आमरे यांनी फलंदाजीचे धडे दिले आहेत. त्यामुळे हे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये नुतक्याच झालेल्या विश्वचषकात भारतीय संघाचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांना वगळता इतर फलंदाजांना चांगला खेळ करण्यात अपयश आले. तसेच कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. त्यामुळे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हे आपले पद कायम राखणार नाहीत, असे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -