घरक्रीडामाझ्याकडून काही चुकीचं घडलं तर मी सुधारतो, पण..; त्रिशतकानंतर पृथ्वी शॉने सोडलं...

माझ्याकडून काही चुकीचं घडलं तर मी सुधारतो, पण..; त्रिशतकानंतर पृथ्वी शॉने सोडलं मौन

Subscribe

युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीत त्रिशतक झळकावलं आहे. मुंबई विरुद्ध आसाम यांच्यातील सामना गुहुवाटीला सुरू होता. यावेळी पृथ्वी शॉने दमदार खेळी करत इतिहास रचला. तसेच त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकले. दरम्यान या त्रिशतकानंतर पृथ्वी शॉने अखेर मौन सोडलं आहे

स्टार स्पोर्टसने पृथ्वी शॉची एक खास मुलाखत घेतली. यावेळी पृथ्वी शॉला सोशल मीडियाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. चांगली कामगिरी करुनही त्याला संघात स्थान दिलं जात नाही, याबाबतही पृथ्वीला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पृथ्वी शॉ असं म्हणाला की, मी सोशल मीडियाचा जास्त विचार करत नाही. बऱ्याचदा मी त्याकडे बघतही नाही. कारण मी जर योग्य असेल तर कोणीही काहीही म्हटले तरी मी त्याकडे लक्ष देत नाही. मला या गोष्टींचा कसलाच फरक पडत नाही. परंतु माझ्याकडून जर काही चुकीचं घडलं तर मी सुधारतो. पण सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांकडे मी दुर्लक्ष करतो, असं पृथ्वी शॉ म्हणाला.

- Advertisement -

पृथ्वी शॉ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रीय असतो. पृथ्वीचे नाव काही दिवसांपूर्वी एका सुंदर मॉडलसोबतही जोडले गेले होते. त्यावेळीही पृथ्वीला जोरदार ट्रोल करण्यात आले होते. मात्र, संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.

पृथ्वीने आसामविरुद्धच्या सामन्यात ३७९ धावांची खेळी केली. तसेच रणजी इतिहासातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने ३८३ चेंडूत ३७९ धावा ठोकल्या आहेत. तर टेस्ट मॅचमध्ये त्याने वनडे स्टाइलमध्ये फलंदाजी केली आहे. ३७९ धावांचा टप्पा पार करतेवेळी पृथ्वीने ४९ चौकार आणि ४ षट्कार मारले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai vs Assam Ranji: रणजी ट्रॉफीत पृथ्वी शॉची बॅट तळपली,दिग्गज खेळाडूंना देखील टाकलं मागे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -