घरताज्या घडामोडीशिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गावर देशातील सर्वात मोठ्या गर्डरचे लॉन्चिंग; मुख्यमंत्री...

शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गावर देशातील सर्वात मोठ्या गर्डरचे लॉन्चिंग; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Subscribe

मुंबई व नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी शासनाने शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गाचे काम सुरू केले आहे. या मार्गावर आर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. नुकातच या शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहाणी केली.

मुंबई व नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी शासनाने शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गाचे काम सुरू केले आहे. या मार्गावर आर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात आले. नुकताच या शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहाणी केली. यावेळी त्यांनी शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक मार्गावरील गर्डरचे आज लॉन्चिंग करण्यात आल्याची माहिती दिली. (Launching of country largest girder on shivadi to nhava sheva sea route CM Shinde information)

शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्गावर लॉन्चिंग करण्यात आलेला गर्डर हा 180 मीटरचा असून, देशातील सर्वात मोठा गर्डर असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवडी ते न्हावा शेवा सागरी मार्ग हा एकूण 22 किलोमीटरचा रस्ता आहे. हा देशातला सर्वात लांब पूल आहे. या पुलामुळे वाहनचालकांच्या वेळेची बचत होणार असून, इंधनाचीही बचत होणार आहे, अशीही माहिती शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

याशिवाय, ज्या ठिकाणी या पुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या पुलाचे काम सुरू असताना फ्लेमिंगोंची संख्या कमी झाली असा माझा समज झाला होता. परंतु, याबाबत चौकशी केली असता फ्लेमिंगोची संख्या अधिक वाढली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, या मार्गावर एकूण 32 गाळे बसविण्यात येणार असून त्यांची निर्मिती जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम व म्यानमारमध्ये करण्यात आली आहे. सागरी मार्गाचे 65 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. शिवडी, न्हावा शेवा सागरी मार्गावर ऑर्थोट्रोपिक स्टील डेकचे गाळे बसविण्याचे काम सोमवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

- Advertisement -

17883 कोटी रुपये खर्च करून 22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. या मार्गावर 7.81 किलोमीटर लांबीच्या पुलावर ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविण्यात येत आहेत. डेकचे एकूण 32 गाळे बसविण्यात येणार असून एका गाळ्याची लांबी 70 मीटर असून रुंदी 14.92 किलोमीटर आहे. प्रकल्पातील पॅकेज 1 व पॅकेज 2 ओएसडी गाळ्यांसाठी 87,452 टन पोलाद वापरण्यात आले आहे.

या स्टील गाळ्यांचे काम पाच देशांतील फॅब्रिकेशन कारखान्यात केले जाते. तेथून ते कारंजा येथील जोडणी यार्डमध्ये आणले जातात व तेथे जोडणी केली जाते. ऑर्थोट्रोपिक स्टील डेकची वाहतूक करण्यासाठी ॲक्वा फ्लोट बार्ज 330 चा वापर केला जात आहे. या बार्जची लांबी 100.58 मीटर व रुंदी 36 मीटर आहे.


हेही वाचा – दिल्ली विमानतळावर प्रवाशाची उघड्यावर लघुशंका; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -