घरक्रीडामाझी खेळी महत्त्वाची ठरली!

माझी खेळी महत्त्वाची ठरली!

Subscribe

अष्टपैलू रविंद्र जाडेजाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात नाबाद ३९ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात विंडीजने भारतासमोर ३१६ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना २४ चेंडूत ३० धावांची आवश्यकता असताना कर्णधार विराट कोहली माघारी परतला. मात्र, जाडेजाने तळाच्या शार्दूल ठाकूरला (६ चेंडूत नाबाद १७) हाताशी घेत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात माझी खेळी महत्त्वाची ठरली, असे सामन्यानंतर जाडेजा म्हणाला.

माझ्या मते माझी खेळी खूप महत्वाची ठरली. मालिकेत १-१ अशी बरोबरी असल्याने हा निर्णायक सामना होता. खेळाडूंवर खूप दबाव होता. या सामन्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. त्यामुळे मी जसा चेंडू येईल, तसे खेळण्याचा प्रयत्न केला. मी आणि विराटने या खेळपट्टीबाबत चर्चा केली. त्याने मला एक बाजू लावून धरण्यास सांगितले आणि तो आक्रमकपणे खेळत सामना संपवण्याचा प्रयत्न करत होता. दुर्दैवाने तो बाद झाला. मात्र, त्याने मला संयमाने फलंदाजी करण्याचा आणि खराब फटके टाळण्याचा सल्ला दिला, असे सामन्यानंतर जाडेजाने सांगितले.

- Advertisement -

जाडेजा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याने आणि इतर भारतीय खेळाडूंनी विंडीजविरुद्धच्या मालिकेत बरेच झेल सोडले. याबाबत विचारले असता जाडेजा म्हणाला, एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मालिकांमध्ये आम्ही बरेच झेल सोडले. त्यामुळे पुढील मालिकेत आम्ही क्षेत्ररक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करू. संध्याकाळच्या वेळी दव पडते आणि क्षेत्ररक्षण करणे अवघड होते. ओल्या चेंडूने सराव करणे आमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -